Tarun Bharat

मनिका बात्रा-साथियान यांना रौप्य

Advertisements

वृत्तसंस्था/ दोहा

विश्व टेबल टेनिस संघटनेतर्फे येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या टेबल टेनिसपटूंनी दोन पदकांची कमाई केली. मनिका बात्रा आणि जी. साथियान यांनी मिश्र दुहेरीत रौप्यपदक तर पुरुष एकेरीत अचंता शरथ कमलने कांस्यपदक मिळविले.

या स्पर्धेतील झालेल्या मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात चीन तैपेईची टॉप सीडेड जोडी लिन ज्यू आणि चेंग चिंग यांनी मनिका बात्रा व साथियान यांचा 11-4, 11-5, 11-3 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. मनिका आणि साथियान यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीतील सामन्यात चीनच्या लिसेनने भारताच्या अचंता शरथ कमलचा 4-3 अशा गेम्समध्ये पराभव केला. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत एक रौप्य आणि एक कांस्य अशी एकूण दोन पदके मिळविली आहेत.

Related Stories

शेवटचा सामना जिंकून लंकेने व्हाईटवॉश टाळला

Patil_p

हैदराबादसमोर पराभवाची श्रृंखला खंडित करण्याचे आव्हान

Patil_p

सुवारेझचा बार्सिलोना बरोबरचा करार समाप्त

Patil_p

अझारेन्का-ओसाका आज जेतेपदाची लढत

Patil_p

फुटबॉलपटू सुनील छेत्री कोरोना बाधित

Amit Kulkarni

टोकियो ऑलिंपिकला जाणाऱया भारताच्या पाच ऍथलीट्सचे लसीकरण लवकरच

Patil_p
error: Content is protected !!