Tarun Bharat

मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी दिल्लीत दोन चिनी नागरिकांना अटक

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली दोन चिनी नागरिकांना अंमलबजावणी संचालनालयाने रविवारी अटक केली. 

चार्ली पेंग आणि कार्टर ली अशी या चिनी नागरिकांची नावे आहेत. दिल्लीत चिनी कंपन्यांसाठी एक मोठे हवाला रॅकेट चालवून हे दोघेही भारत सरकारचा कोट्यवधींचा कर बुडवत होते. आयकर विभागाने गेल्या वर्षी चार्ली पेंगच्या छुप्या अड्ड्यांवर छापा टाकला होता. त्यानंतर दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने नुकताच पेंगविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.

ईडीने ऑगस्टमध्ये चार्लीविरुद्ध मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ईडी चार्ली पेंगच्या सर्व संशयास्पद व्यवहारांची चौकशी करत होते. पेंग केवळ भारतातील हवाला व्यवसायातच नव्हे तर तिबेटी धर्मगुरू दलाई लामांची हेरगिरी करत असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. 

Related Stories

सातारा : कास तलाव ‘ओव्हर फ्लो’

Archana Banage

महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पाचा विद्यार्थीनींना लाभ

datta jadhav

अखेर त्या कोयता गँगच्या मुसक्या आवळल्या

Patil_p

महाराष्ट्र केसरीच्या गदेचे पुण्यात पूजन

datta jadhav

ओबीसींचे राजकारणातील अस्तित्वच संपविण्याचा तिघाडी सरकारचा कट

Patil_p

फ्लॉगथॉनमध्ये 80 किलो प्लास्टिक गोळा

Patil_p
error: Content is protected !!