Tarun Bharat

मनु भाकरच्या प्रशिक्षण केंद्रात बदल

Advertisements

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताची महिला नेमबाज मनु भाकरने आपल्या प्रशिक्षण केंद्रामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ती हरियाणातील गोरिया ग्रामीण भागात वास्तव्य करीत होती आणि ती आपल्या निवासस्थानी 25 मार्चपासून कोरोना संकटामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने नेमबाजीचा सराव करीत होती. आता तिने आपला सराव दिल्लीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

नेमबाज मनु भाकरने आपल्या निवासस्थानाच्या परिसरात 10 मी. एअर पिस्तुल शुटींग रेंज तयार केली होती. तसेच त्या ठिकाणी अलिकडेच इलेक्ट्रॉनिक टार्गेट सिस्टीमची सुविधा उपलब्ध झाली होती. तब्बल चार महिन्यांच्या कालावधीत तिला हरियाणातील आपल्या निवासस्थानी असलेल्या शुटींग रेंजमध्ये 25 मी. पिस्तुल नेमबाजीचा सराव करता आला नाही. या समस्येमुळे मनु भाकरने आपल्या प्रशिक्षण सराव ठिकाणात बदल करण्याचा निर्णय घेतला असून येत्या दोन-तीन दिवसांमध्ये ती दिल्लीत दाखल होणार आहे. गेल्याच आठवडय़ात दिल्लीतील भारतीय क्रीडा प्राधीकरण मंडळाने (साई) डॉ. कर्नी सिंग शुटींग रेंज सरावासाठी खुले केले आहे. या शुटींग रेंजमध्ये भारताच्या अव्वल नेमबाजांना सरावासाठी निमंत्रित केले असल्याची माहिती अखिल भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेच्या प्रवक्त्यानी दिली. 15 जुलै रोजी या संघटनेची बैठक बोलाविली असून त्यामध्ये नेमबाजांच्या सरावा संदर्भात चर्चा करून निर्णय घेतला जाईल. भारताचा नेमबाज शिराज शेखने आपल्या सरावाला दिल्लीतील या शुटींग रेंजमध्ये यापूर्वीच प्रारंभ केला आहे. मिराज अहमद खान, दिवनेश सिंग पनवार, दीपककुमार हे या शुटींग रेंजमध्ये सरावासाठी दाखल झाले आहेत. 2021 साली होणाऱया टोकियो ऑलिंपिक स्पर्धेकरिता भारताचे 15 नेमबाज आतापर्यंत पात्र ठरले आहेत.

Related Stories

वनडे मालिकेसाठी लंकेचे नेतृत्व शनाकाकडे

Patil_p

द. आफ्रिकन महिलांचा भारताविरुद्ध मालिकाविजय

Patil_p

माझी प्रकृती ठणठणीत : गांगुली

Patil_p

भारतीय हॉकी संघाला दडपण हाताळण्याची गरज

Patil_p

पाकचा द.आफ्रिकेवर 7 गडय़ांनी विजय

Patil_p

स्पेन फुटबॉल संघातून कर्णधार रॅमोसला डच्चू

Patil_p
error: Content is protected !!