राजेंद्र होळकर / कोल्हापूर
अत्यंत कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते. असे नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांची कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचा आदेश बुधवारी काढण्यात आला आहे.
मनोजकुमार लोहिया यांनी यापूर्वी मुंबई, पुण्यासह राज्यातील इतर ठिकाणी वेग-वेगळ्या पदावर कर्तव्य बजावले आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक क्लिष्ट गुन्ह्याचा छडा लावण्यास पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले होते. येथेच त्यांना पोलीस उप महानिरीक्षक पदावर बढती मिळाली. बढतीवर मुंबई येथील महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळात पोलीस उप महानिरीक्षक म्हणून बदली झाली. याठिकाणी त्यांनी आपल्या कामाचा सपाटा लावून पोलीस दलाच्या वाहनामध्ये जीपीसी सिटीम लावण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेवून अंमलात आणला.
पोलीस उप महानिरीक्षक म्हणून लोहिया कार्यरत असताना त्यांना विशेष पोलीस महानिरीक्षकपदी पदोन्नती मिळाली. पदोन्नतीवर त्यांची बदली न करता राज्याच्या गृह खात्याने याच रस्ते परिवहन महामंडळात मुख्य दक्षता अधिकारी पदी नियुक्ती केली. त्यानंतर त्यांची राज्याच्या गृह खात्याने नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली केली. लोहिया यांची राज्याच्या पोलीस दलात अत्यंत कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून वेगळी ओळख आहे. अशा या पोलीस अधिकाऱ्यांची राज्याच्या गृह खात्याने कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

