Tarun Bharat

मन निरोगी ठेवा

’ए साउंड माईन्ड, इज इन साउन्ड बॉडी’ निरोगी शरीरात निरोगी मन असते. पण हे ओळखायचे कसे? निरोगी मन मजबूत असते. निरोगी मन लवचिकही असते. असे मन सहनशीलही असते आणि मुख्य म्हणजे अशा मनाला व्यवस्थित मांडणी, जुळवणी करता येते. समन्वय साधता येतो. निरोगी मन पाण्यासारखे पटकन मिसळून जाते. पुन्हा ते एकसारखे, झऱयासारखे पुढे जात असते. आपण जेव्हा काहीतरी नवे निर्माण करत असतो सर्जनशील असतो, तेव्हा मनाची लवचिकता दिसून येते.

नवे काही सुचण्यासाठी, करण्यासाठी, वेगळेच वळण घेण्यासाठी, विचारांची नवीन समीकरणे मांडणे हे मनाच्या लवचिकतेनेच शक्मय होते. मनुष्य जादा निग्रही झाला, की तो संपलाच म्हणून समजावे. शरीराला ताठरपणा आला, कडकपणा आला, की ते नकोसे होते. तसेच मनाला घट्ट चिकटला, मन दुराग्रही झाले की ते रोगट बनू लागते व नकोसे होते.‘ नव्या कल्पनांशी खेळणे, विचारांची नव्याने संगती लावणे किंवा नवीनच विचार करणे, नव्या शक्मयता निर्माण करणे, हे मनाच्या लवचिकतेचे दर्शन फक्त निरोगी मनात घडते. निरोगी मन आपल्या कल्पना कृतीत उतरवते. कितीही प्रतिकूल परिस्थिती येवो, जो मनाने टिकून राहतो, कृतीचा वेग वाढवतो तो नेहमीच अनुकूल परिस्थिती निर्माण करू शकतो.

निरोगी मन स्वतःच्या कार्यात मग्न असते. ते दुसऱयावर टीका करण्यात वेळ दवडत नाही. निरोगी मन चांगले कोणते ते पटकन कळण्याची अक्कल दाखवते. व्यवस्थित मांडणी-जुळणी करता येणे हे निरोगी मनाच्या समन्वयशक्तीचे निदर्शक आहे. पण मन म्हणजे नक्की काय? मन म्हणजे कल्पना, हेतू, कामना, जो रस जास्त प्रभावी, ती त्याची प्रकृती. या रसांचा समतोल बिघडला की विविध मानसिक आजार होतात. भगवद्गीतेत भगवंतांनी मनाच्या सत्त्व, रज, तम अशा त्रिविध गुणांचे वर्णन केले आहे. थोडक्मयात तो माणूस तशाच स्वभावाचा किंवा शरीर प्रकृतीचा असतो. तरीही प्रयत्नाने मन निरोगी करता येते.

त्या मनाचा भंग होता कामा नये. मनरूपी पाण्यावर आलेले तरंग हळुहळू विरळ होतात, दबतात आणि मन पुन्हा अखंड एकसंध होते. हा मनाचा गुणधर्मच आहे. मन हे मुळात चांगले असते. पण त्याला चांगल्या कामाला लावले नाही तर ते बिघडते. म्हटले आहे, ‘अ‍Ÿन एम्पटी माइन्ड इज ए डेव्हिल्स वर्कशॉप’ ‘माइन्ड इज न्यूझन्स’, ‘माइन्ड इज ए स्ट्रेन्जर’, ‘इट इज ए फॉरेन बॉडी इन अवर ब्लड’ म्हणून मन नावाच्या परक्मया वस्तूचे अजिबात कौतुक करता कामा नये. लगेचच ते शेफारते. लक्ष्यावर दृष्टी ठेवून टास्कमास्टर प्रमाणे निरोगी मनाला कामात जुंपलेच पाहिजे. निरोगी मनाचे निदान असे करावे, स्वतःच करावे आणि त्याला ओळखून राहावे. नाही तर ते दगा देईल.

Related Stories

कलारंगी विश्व रंगले..

Patil_p

मनोरंजनाचा ‘धुरळा’

Patil_p

कर्मण्ये वाधिकारस्ते

Patil_p

अमूल्य सौंदर्य

Patil_p

प्रयत्न वाळूचे…

tarunbharat

धुक्मयाच्या सोबतीची पहाट

Patil_p
error: Content is protected !!