Tarun Bharat

मयत रुग्णाची हेळसांड झाल्याने वडूज ग्रामीण रुग्णालयात तणाव

प्रतिनिधी / वडूज

हैद्राबाद येथे शनिवार दि. २७ रोजी सकाळी ११ वाजता संपत ज्योती कर्णे (वय ६५) यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. मृतदेह मूळ गाव (डिस्कळ) येथे आणताना डिस्कळ येथील प्रशासनाने आडमुठी भूमिका घेतल्याने तब्बल १० तास मृतदेहाची हेळसांड झाली.तर त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी प्रशासनाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. अखेर त्या मृतदेहाचा अंत्यविधी प्रशासनाच्या निर्देशानुसार वडूज येथील स्मशानभूमीत प्रशिक्षीत कर्मचार्‍यांकडून करण्यात आला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की , गत ३५ वर्षांपूर्वी मयत संपत ज्योती कर्णे हे हैदराबाद येथे व्यवसाय निमित्त स्थायिक झाले होते. तीन वर्षांपूर्वी त्यांची बायपास सर्जरी झाली होती. शनिवार दि . २७ रोजी त्यांना घरी उलटी धाप असा त्रास जाणवू लागल्याने गव्हर्नमेंट जनरल चेस्ट हॉस्पिटल, इरानुमा( हैद्राबाद ३८) येथे नेण्यात आले. रुग्णालयात उपचारपूर्वी ते मयत झाले असल्याचे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. नातेवाईक यांनी अंत्यविधीसाठी त्यांचा मृतदेह डिस्कळ येथे आणण्याची प्रक्रिया सुरू केली. त्या संदर्भात डिस्कळ येथील पोलीस पाटील, सरपंच यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी माण तालुक्यातील पिंगळी येथे येऊन थांबा असे नातेवाईकांनी सांगितले. त्यानंतर बराच वेळ गेल्यानंतर त्यांनी डिस्कळ येथील संबंधीत प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनी मृतदेह वडूज येथील ग्रामीण रुग्णालयात न्या अशा सूचना केल्या. त्याप्रमाणे तो मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे वडूज ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.

बराच कालावधी गेल्यानंतर डिस्कळ येथील संबंधीत यांनी कोणताच संपर्क नातेवाईकांशी न केल्याने नातेवाईकांनी मृतदेह डिस्कळ कडे नेण्याचा निर्णय घेतला. ही बाब पोलीस प्रशासनाला व आरोग्य विभागाला समजताच पोलीस प्रशासनाने पुसेगाव हद्दीत बॅरॅकेट लावून ही रुग्णवाहिका अडवली. पुसेगाव व वडूज पोलिसांनी तसेच आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी नातेवाईकांची समजूत घालून हा मृतदेह पुन्हा अंत्यविधीसाठी वडुजकडे आणला. या दरम्यान वडूज ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांनी आक्रोश करीत संबंधित प्रशासनाने केलेल्या हलगर्जीपणा बद्दल व दिवसभर ताटकळत ठेवल्याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. तर संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी ही नातेवाईकांनी प्रसिद्धिमाध्यमांकडे केली.

मृत्यूचे कारण अस्पष्ट असल्याने त्या मृतदेहावर वडूज येथील स्मशानभूमीत प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून सायंकाळी ७ च्या सुमारास अंत्यविधी करण्यात आला. अंत्यविधी झाल्यानंतर नातेवाईकांनी पुसेगाव पोलीस ठाण्याकडे धाव घेतली असल्याचे समजले.
डिस्कळ येथील ग्रामसमितीने तहसील प्रशासनाशी संपर्क साधून हैद्राबाद येथील मूळ गाव डिस्कळ येथील मृतदेह घेऊन नातेवाईक येत असल्याची माहिती दिली होती. २१ मे च्या अद्यादेश प्रमाणे जिथे मृत्यू झाला आहे त्याच ठिकाणी अंत्यविधी करावा असा शासनाचा अद्यादेश असून त्या निर्देशाप्रमाणे आम्ही आमची भूमिका पार पाडली. संबंधित मयताच्या मुलाला याबाबत पूर्व कल्पना ही दिली होती. या गंभीर घटनेबाबत तहसीलदार यांच्याशी ही मोबाईलवर संपर्क झाला असता या मृतदेहाचा अंत्यविधी वडूज येथे प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून व्हावा असे सांगण्यात आले होते.

Related Stories

‘देवाचे गोठणे’ पोरके

Patil_p

उजनी धरण ठरतेय पक्ष्यांसाठी नंदनवन

Archana Banage

ठेकेदारांच्या भल्यासाठी नव्हे तर लोकांसाठी कामे करा!

Patil_p

भारत- पाकिस्तान यावर्षी एकमेकांना भिडणार; अशिया कपचे कॅलेंडर जाहीर

Abhijeet Khandekar

कर्नाटक: आतापर्यंत १,३७० जणांना म्युकरमायकोसिसचा संसर्ग, तर ५१ मृत्यूची नोंद

Archana Banage

टाटाच्या ‘सुपरऍप’साठी करावी लागणार प्रतीक्षा

Patil_p