Tarun Bharat

मरकज : इंडोनेशियातून आलेल्या धर्मगुरूंसह 12 जणांवर गुन्हा

ऑनलाईन टीम / नांदेड : 

दिल्लीच्या निजामुद्दीन येथील मरकज कार्यक्रमात हजेरी लावल्याची माहिती लपवून 15 मार्चपासून नांदेड शहरात वास्तव्यास असलेल्या इंडोनेशियातील दहा धर्मगुरूंसह दिल्लीतील दोघांवर इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार,  इंडोनेशियाचे दहा नागरिक ज्यात पाच पुरुष आणि पाच महिला तसेच दिल्ली येथील दांपत्य असे 12 जण 15 मार्चपासून चार एप्रिलपर्यंत नांदेड शहरात वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्यास होते. त्यांनी 2 मार्च ते 8 मार्च या कालावधीत दिल्लीच्या निजामुद्दीन येथील मरकज कार्यक्रमात हजेरी लावली होती. नांदेडमध्ये आल्यानंतर त्यांनी मरकज कार्यक्रमात सहभागी असल्याची माहिती लपवली. 

देशात जमावबंदी आणि संचारबंदीचे आदेश असतानाही हे सर्वजण एकाच ठिकाणी संचार करत असल्याची माहिती त्यांच्या मोबाईलचे सी.डी.आर आणि एस.डी.आर. तपासल्यावर समोर आली. त्यांच्याविरुध्द कलम 188, 269, 270 सह विदेशी व्यक्ती अधिनियम 1946 च्या कलम 14 सह साथरोग प्रतिबंधक अधिनियम 1897 च्या कलम तीन आणि चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

INS विक्रमादित्यवर आग

datta jadhav

बँकिंग-सायबर फ्रॉड रोखण्याची तयारी

Patil_p

2 फिटनेस टेस्टमध्ये फेल, कार थेट भंगारात

Patil_p

Maharashtra Budget 2023 LIVE Updates: देवेंद्र फडणवीसांकडून महाराष्ट्राच्या अर्थसंकल्प सादरीकरणाला सुरुवात

Abhijeet Khandekar

महिलांचे लैंगिक शोषण रोखण्यासाठी दिशानिर्देश

Patil_p

मंत्री मुश्रीफांचा घोटाळा बाहेर काढला म्हणून माझ्या अटकेचे आदेश; किरीट सोमय्यांचा आरोप

Archana Banage