Tarun Bharat

मरकज कार्यक्रमला गेलेल्या सोलापुरातील 47 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

Advertisements

तरुण भारत संवाद प्रतिनिधी : सोलापूर

दिल्लीतील निजामुद्दीन परिसरात झालेल्या तब्लिक समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्यांपैकी काहीजणांना कोरोना संसर्ग झाल्याचं आढळून आल्यानंतर यात सहभागी  झालेल्यांची तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करण्यात आली.  सोलापुरात आत्तापर्यंत 47 जणांची यादी  मिळाली होती.  या सर्वांची तपासणी झाली असून अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत 490 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये होत्या. त्यापैकी 382 व्यक्तींचा कालावधी पूर्ण झाला आहे. तर उर्वरित 108 व्यक्ती  होम क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. आयसोलेशन वार्डात 127 रुग्ण दाखल होते. त्यापैकी  122 व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित  5 व्यक्तींचे रिपोर्ट येणे बाकी आहे. एकंदरीत आजआखेर सोलापूर जिल्ह्यात एकही व्यक्ती कोरोनाबाधित नसल्याचे  शंभरकर यांनी सांगितले. 
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन विशेष खबरदारी घेत असल्यामुळे जिल्ह्यात एकही रुग्ण कोरोनाबाधीत नसल्याचे शंभरकर यांनी सांगितले. इन्स्टिट्यूशनल व्यक्ती 192, त्यापैकी 65 जणांचा कालावधी पूर्ण केलेल्या, 127 व्यक्ती अद्यापही इन्स्टिट्यूशनलमध्ये  आहेत. आयसोलेशन वार्ड मध्ये 127 रुग्णांची तपासणी झाली असून त्यापैकी 122 व्यक्तीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात गेल्या पाच दिवसात 207316 शिधापत्रिकाधारकांना तब्बल 5302 मेट्रिक टन अन्नधान्याचं वाटप करण्यात आलं आहे असेही शंभरकर यांनी सांगितले
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आतापर्यंत जिल्ह्यात 2039  गुन्हे
संचारबंदी, लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्ह्यात आतापर्यंत 2039 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी  197 जणांना अटक करण्यात आली आहे. जिल्ह्यात 2250 वाहने जप्त करण्यात आल्याची माहिती शंभरकर यांनी दिली
मरकजला जाऊन आलेल्या व्यक्तीने स्वतःहून तपासणी करावी
दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमात  सोलापुरातील व्यक्ती जाऊन आले असतील त्या व्यक्तीने स्वतःहून तपासणी करून घ्यावी. असे आवाहन शंभरकर यांनी केले आहे. तसेच लॉक डाऊन उठल्यानंतर याविषयी कार्यवाही होईल असे सुचित करण्यात आले असून यापुढेही ही मॉर्निंग वॉक, गरज नसताना शहरात फिरणे ,गल्लीबोळात गर्दी करुन गप्पा मारत बसणे, गर्दी जमवणे असे कृत्य निदर्शनास आल्यास कारवाई केली जाणार आहे.

मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी, सोलापूर

Related Stories

“पेट्रोलच्या दरांप्रमाणे आपण ही शंभरी पार करा” – रोहित पवार

Archana Banage

जावलीत कोरोनाचा विळखा सुटता सुटेना ..!

Patil_p

सोलापूर : एसटी बसच्या चाकाखाली आल्याने वृद्ध महिला ठार

Archana Banage

अमित शहांचा मुंबई दौरा; ‘मिशन मुंबई’ महापालिकेचा करणार शुभारंभ

Archana Banage

महाराष्ट्रात 31 जानेवारीपर्यंत वाढवले लॉकडाऊनचे निर्बंध

Tousif Mujawar

सातारा शहरात २ कोरोनाबाधितांची वाढ

Archana Banage
error: Content is protected !!