Tarun Bharat

मराठमोळे मल्ल निघाले जग जिंकायला!

फिरोज मुलाणी / औंध :   

रशिया येथे होणाऱ्या जागतिक ज्युनिअर कुस्ती स्पर्धेसाठी वेताळ शेळके (सोलापूर) आणि पृथ्वीराज पाटील (कोल्हापूर) यांनी भारतीय कुस्ती संघात आपले स्थान निश्चित केले आहे. जग जिंकायला निघालेल्या मराठमोळ्या मल्लांच्या दमदार कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.    

उफा ( रशिया ) येथे 16 ते 22 ऑगस्ट 2021 दरम्यान होणाऱ्या जागतिक जुनियर फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या वेताळ शेळके व  पृथ्वीराज पाटिल यांची निवड निवड झाली आहे. इंदिरा गांधी स्टेडीयम दिल्ली येथे झालेल्या निवड चाचणीमध्ये 86 किलो वजनी गटात वेताळ शेळके याने अतिशय नेत्रदीपक कुस्त्या करून अंतिम फेरीत बाजी मारली. वेताळ याचे मूळ गाव बेंबळे ता. माढा जिल्हा सोलापूर आहे. घरातील परिस्थिती अतिशय हालाखिची आहे. सध्या तो आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे येथे अर्जूनवीर काका पवार,गोविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचा सराव करतो.ज्युनिअर एशियन स्पर्धेत पदक विजेता आणि वरीष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत पदक प्राप्त वेताळ अतिशय होतकरू मल्ल आहे. 

92 किलो वजनी गटात कुस्तीपंढरीतील देवठाणे ता पन्हाळा येथील पृथ्वीराज पाटील यांने हरियाणा, दिल्ली व पंजाबच्या तगडय़ा मल्लांना निवड चाचणीत पराभवाची धूळ चारली. जागतिक जुनियर फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय कुस्ती संघात स्थान पटकावले आहे. शाहू कुस्ती केंद्र (शिंगणापूर , कोल्हापूर) येथे प्रशिक्षक जालिंदर मुंडे व आंतरराष्ट्रीय मल्ल शिवाजी पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. महाराष्ट्र केसरी, वरीष्ठ राष्ट्रीय स्पर्धा, कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत त्याने पदक मिळवून कुस्तीक्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्राची मान उंचावण्याची जबाबदारी या दोन्ही मल्लावर आहे. या दोघांच्या कामगिरीकडे तमाम कुस्ती शौकिनांच्या नजरा लागल्या आहेत.  

Related Stories

किसन वीर मध्ये ऐश्वर्या डेरेंचा सत्कार

Patil_p

सातारा : दिवसभरातील 37 जणांसह जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे चौथे शतक

Archana Banage

हडपसर, पुणे येथून आलेल्या मृत व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह

Archana Banage

शाब्बास! वर्णेतील अनुष्काची कुवेतमध्ये सुवर्ण दौड

Archana Banage

जुन्या पेन्शनबाबत काढलेली अधिसूचना रद्द करा : मा आ. दत्तात्रय सावंत

Archana Banage

भाजपाचा सेवा पंधरावढा उपक्रमाची फलटणमधून होणार सुरुवात

Patil_p