Tarun Bharat

मराठमोळ्या पोशाखाचा अमेरीकेत गौरव

मिसेस आशिया युएसए स्पर्धेत कणकवलीच्या राधिका राणे- भोसले यांनी पटकाविला दुसरा क्रमांक

कणकवली – प्रतिनिधी :-

कणकवलीच्या कन्या आणि पुण्याच्या स्नुषा राधिका राणे- भोसले यांनी अमेरिकेतील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणा-या मिसेस आशिया युएसए स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकाविला आहे. अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे नुकत्याच पार पडलेल्या मिसेस आशिया या स्पर्धेत त्यांनी केलेल्या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यावरील प्रेरित पेहरावाला उपस्थितांची विशेष पसंती मिळाली. मराठमोळ्या पोशाखाचा अमेरीकेत झालेल्या गौरवाने राधीकाचे विविध स्तरातुन कौतुक होत आहे.

व्हर्जेलिया प्रोडकशन्स यांच्या वतीने अमेरिकेत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणा-या मिसेस आशिया स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. खास विवाहित महिलांसाठी असलेल्या या स्पर्धेत सौंदर्य स्पर्धा, सामाजिक सेवा, वेशभूषा, नृत्य आणि गाऊन स्पर्धा अशा विविध विभागात गुण मिळवीत विजेता ठरविला जातो. यावर्षीच्या अंतिम फेरीसाठी आशिया खंडातील विविध देशांमधून तब्बल ४८ स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणा-या राधिका यांनी दुसरा क्रमांक पटकाविला आहे.

राधिका राणे- भोसले यांनी अभियांत्रिकी विषयातील पदवी शिक्षणानंतर बिझिनेस अॅडमिनिस्ट्रेशन या विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली असून अमेरिकेतील एसजीएस टेलिकॉम या तंत्रज्ञानाशी संबंधित स्टार्ट अपमध्ये उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. २०१५ साली फेसबुकमध्ये वरिष्ठ सुरक्षा अभियंते म्हणून कार्यरत असलेल्या पुण्यातील अमर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना तीन वर्षांचे मुल असून आपल्या करिअर सोबतच अमेरिकेतील अनेक महत्त्वाच्या ब्रॅण्डसाठी त्या मॉडेलिंग करतात. त्यांचे सासू सासरे शिरीष व शर्मिला भोसले, आई वडील राजन व रश्मी राणे, इतर कुटुंबीय, अमेरिकेतील सनीवेल शहराचे महापौर लॅरी क्लायन यांचे विशेष सहकार्य राधिका यांना मिळाले. राधिका यांना दिलेल्या शुभेच्छांबद्दल खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचेही त्यांनी विशेष आभार मानले.

Related Stories

रत्नागिरीतील तो स्फोट गॅस सिलिंडर गळतीमुळे

Patil_p

राज्यात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव झाल्याचे स्पष्ट

Archana Banage

मनसेतर्फे ४५ पूरग्रस्त कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण

NIKHIL_N

मित्रांसमवेत नदीवर पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

Anuja Kudatarkar

शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

Anuja Kudatarkar

बोलक्या बाहुल्यातून शिक्षण आनंददायी करणारे ‘कलाशिक्षक’

Patil_p
error: Content is protected !!