Tarun Bharat

मराठवाडा साहित्य संमेलन देगलूरऐवजी औरंगाबादला

25 व 26 सप्टेंबररोजी दोन दिवसच आयोजन : कांदबरीकार बाबू बिरादार अध्यक्ष

प्रतिनिधी/सोलापूर

एक्केचाळीसावे होणारे मराठवाडा साहित्य संमेलन मार्चमध्ये देगलूर येथे घेण्याचे ठरले होते. परंतु जागतिक कोरोना महामारीच्या प्रभावामुळे ते स्थगित करण्यात आले होते. पुढे दीर्घकाळ वाट पाहून अखेर ते रद्द करण्यात आले. आता ते 25 व 26 सप्टेंबर 2029 रोजी औरंगाबाद येथे आयोजित करण्याचे ठरले आहे.  मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी शुक्रवारी या संमेलनाची घोषणा करताना संमेलनाच्या आयोजनाची माहिती दिली. देगलूरचे ज्ये÷ कादंबरीकार बाबू बिरादार हे या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असतील.

कौतिकराव ठाले-पाटील आणि इतर पदाधिकाऱयांशी `लोकसंवाद फाऊंडेशन’चे अध्यक्ष डो. राजेश करपे त्यांचे सहकारी डॉ. राम चव्हाण, डॉ. रामचंद्र काळुंखे, डॉ. गणेश मोहिते, डॉ. हंसराज जाधव, डॉ. रविकुमार सावंत, प्रा. जिजा शिंदे आणि राम शिनगारे यांनी संमेलनाच्या आयोजनासंबंधी सविस्तरपणे चर्चा केली. कोरोना नियम पाळत कोणताही भपकेबाजपणा न करता कमीत कमी खर्चात साधेपणाने हे संमेलन कसे होईल, यावर चर्चा करून हे संमेलन घेण्याचा निर्धार करण्यात आला आहे. तसेच अगदी कमी दिवसांत म्हणजे शनिवार-रविवार 25 व 26 सप्टेंबर 2021 ह्या दोन दिवशी हे साहित्य संमेलन घेण्याचे निश्चित केले आहे.

कोरोना महामारीचे दडपण व महाराष्ट्र शासनाचे व स्थानिक प्रशासनाचे बैठकव्यवस्थेचे नियम पाळून हे संमेलन घेण्यात यावे ह्या साहित्य परिषदेने दिलेल्या सूचनांचे पालन `लोकसंवाद फाऊंडेशन’ ने करण्याचे मान्य केले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी देगलूरचे ज्ये÷ कादंबरीकार बाबू बिरादार आहेत. `लोकसंवाद फाउंडेशन’चे कार्यकर्त संमेलनाच्या कामाला लागले असून त्यांनी बँकेत संमेलनाचे स्वतंत्र खातेही उघडले आहे आणि दोन दिवसांत जमा केलेला निधी बँकेत ठेवण्यात आला आहे. हे संमेलन उस्मानाबादप्रमाणेच पूर्णपणे लोकवर्गणीतून घ्यावे, असा संकल्प मराठवाडा साहित्य परिषदेच्या व लोकसंवाद फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आला आहे.

मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी शुक्रवारी या संमेलनाची घोषणा करताना संमेलनाच्या आयोजनाची माहिती दिली. यावेळी परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. किरण सगर, कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष कुंडलिक अतकरे आणि कार्यकारिणी सदस्य डॉ. रामचंद्र काळुंखे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Related Stories

सोलापुरात कोरोनाचा चौथा मृत्यू; रुग्णांची संख्या 41 वर

Archana Banage

विडी कारखाने सुरू करा, अन्यथा कारवाई : मनपा आयुक्त पी. शिवशंकर

Archana Banage

सोलापूर ग्रामीण भागात 171 कोरोना रुग्णांची भर

Archana Banage

अक्कलकोट येथे बाजारसाठी आलेल्या महिलेच्या पैशावर चोरट्याचा डल्ला

Archana Banage

सोलापूर : उद्यापासून कुकडी कालव्याचे आवर्तन सुरु होणार – आ. संजयमामा शिंदे

Archana Banage

सोलापूर शहरात आज 95 पॉझिटिव्ह तर एकाचा मृत्यू

Archana Banage