Tarun Bharat

‘मराठा’च्या जवानांचा दौडमध्ये सहभाग

सातव्या दिवशीच्या दौडला मिलिटरी महादेव मंदिर शिवतीर्थापासून प्रारंभ : मराठा लाईट इन्फंट्रीतर्फे जोरदार स्वागत

प्रतिनिधी /बेळगाव

‘शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती’ अशा जोशपूर्ण गाण्यातून मराठा लाईट इन्फंट्रीचे जवान शत्रूवर तुटून पडतात. हीच ऊर्जा घेऊन जवान बुधवारी दौडमध्ये सहभागी झाले. यावषी कोरोनामुळे निर्बंध असल्याने प्रातिनिधिक स्वरुपात दौड काढली जात असली तरी मराठा लाईट इन्फंट्रीने दौडचे जोरदार स्वागत केले. देशभक्ती कशी असते, हे या सातव्या दिवशीच्या दौडमधून दिसून आले.

बुधवारी सातव्या दिवशीच्या दौडला मिलिटरी महादेव मंदिर येथील शिवतीर्थापासून प्रारंभ झाला. शिवप्रति÷ानचे ज्ये÷ सहकारी शंकर भातकांडे यांच्या हस्ते ध्वज चढविण्यात आला. यावेळी मराठा लाईट इन्फंट्रीचे अधिकारी व जवान सहभागी झाले. हे जवान हातामध्ये भगवा ध्वज घेऊन दुर्गा दौडमध्ये सहभागी झाले होते. 

काँग्रेस रोड, गोगटे सर्कल, खानापूर रोड, संचयनी सर्कल, धर्मवीर संभाजी चौक, यंदे खूट, समादेवी गल्ली मार्गे संयुक्त महाराष्ट्र चौकातील मारुती मंदिरात दौडची सांगता झाली. खडेबाजार पोलीस स्थानकाचे निरीक्षक दिलीप निंबाळकर यांच्या हस्ते आरती करण्यात आली. आरती झाल्यानंतर निंबाळकर यांच्या हस्ते ध्वज उतरविण्यात आला.

शुक्रवार दि. 15 रोजीचा दौडचा मार्ग

विजयादशमी दिवशीच्या नवव्या दिवशीच्या दौडला मारुती गल्ली येथील मारुती मंदिरापासून प्रारंभ होणार आहे. बसवाण गल्ली, रामलिंगखिंड गल्ली येथून धर्मवीर संभाजी चौक येथे यावषीच्या दौडची सांगता होईल.

Related Stories

शहापुरात मोबाईल चोरीच्या घटनांत वाढ

Patil_p

महामार्ग रुंदीकरण कामातून दिलीप बिल्डकॉन कंपनी बाहेर?

Amit Kulkarni

सेलडीडविषयी तात्काळ निर्णय घ्या

Patil_p

शिवप्रतिष्ठान तर्फे बेळगाव मध्ये आनंदोत्सव साजरा

mithun mane

राकसकोप जलाशयाचे उघडले तीन दरवाजे

Amit Kulkarni

शासनाच्या प्रयत्नांना नागरिकांच्या पाठबळाची गरज

Omkar B