Tarun Bharat

मराठा आरक्षणप्रश्नी राष्ट्रपती कोविंद यांनी दिली वेळ, 2 सप्टेंबरला चर्चा

Advertisements

प्रतिनिधी / कोल्हापूर

मराठा आरक्षणप्रश्नी चर्चा करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुरूवार 2 सप्टेंबरची वेळ दिली आहे. ही माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्व्टि करून दिली आहे.

खासदार संभाजीराजे यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे मराठा आरक्षणप्रश्नी चर्चा करण्यासाठी भेट देण्याची विनंती केली होती. मराठा समाजाच्या भावना राष्ट्रपतींना समजाव्यात हा या भेटी मागील हेतू आहे. संभाजीराजे यांच्या विनंतीनुसार राष्ट्रपती कोविंद यांनी गुरूवार 2 सप्टेंबरला भेट घेऊन चर्चा करण्यासंदर्भात वेळ दिली आहे. या परवानगीनंतर आता संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखालील सर्व पक्षीय खासदार शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटणार आहे. दरम्यान, या भेटीवेळी सर्वपक्षीय प्रत्येकी एक खासदार प्रतिनिधीने उपस्थित राहावे, यासाठी सर्व पक्षांच्या अध्यक्ष, गटनेत्यांना पत्रे पाठविण्यात आल्याची माहिती खासदार संभाजीराजे यांनी दिली.

मराठा आरक्षणाच्या लढÎात नजिकच्या काळात राष्ट्रपतींची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे. त्यादृष्टीने संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीय खासदारांने शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटणे, मराठा समाजाचा स्थिती, प्रश्न आणि आरक्षणाची गरज त्यांना विषद करणे या गोष्टी अत्यंत मोलाच्या ठरणार आहेत.

Related Stories

कोल्हापूर जिल्हय़ात तिघांचा बळी, 150 पॉझिटिव्ह

Archana Banage

गावागावांत राजकीय हालचालींना वेग,गटप्रमुखांकडून उमेदवारांची चाचपणी

Archana Banage

कोल्हापूर : फिरस्त्याकडून फिरस्त्याचा खून

Archana Banage

आ. नितेश राणे यांना डिस्चार्ज, जामिन मिळाल्यानंतर राणेंची घरवापसी

Abhijeet Khandekar

दहावी, बारावी सतरा नंबर अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

Archana Banage

होसूर घाटातील गटारी गायब

Archana Banage
error: Content is protected !!