Tarun Bharat

मराठा आरक्षणाचा प्रश्न संसदेत मांडण्यात अडथळा

Advertisements

सभागृहाच्या कामकाज स्थगितीचा फटका, खासदार संभाजीराजे यांची माहिती, सत्ताधारी आणि विरोधकांनी समन्वयाने मार्ग काढावा

प्रतिनिधी / कोल्हापूर

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्षामुळे स्थगित होत आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न संसदेत मांडण्यात अडथळा येत असल्याची खंत खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात केलेल्या ट्व्टिमध्ये संभाजीराजे यांनी म्हटले आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून मी मराठा आरक्षणाचा प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी प्रयत्न करत आहे. सभापती महोदयांनी तीन वेळा मला प्रश्न मांडण्यासाठी वेळ देखील दिली.

मात्र सत्ताधारी आणि विरोधी पक्षात काही विषयांवर असमन्वय असल्याने त्याचे पडसाद सभागृहात उमठत आहेत. त्यामुळे सभागृहाचे कामकाज वारंवार स्थगित होत आहे. यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्याप संसदेत मांडता आलेला नाही. इतरही अनेक महत्वाचे प्रश्न प्रलंबित आहे. विरोधकांचा ज्यावर आक्षेप आहे, त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी सामंजस्याने एकत्रित बसून विषय सोडवावेत, मात्र त्यासाठी संसदेच्या कामकाजात बाधा आणू नये.

Related Stories

तामिळनाडूत चक्रीवादळाचे थैमान

Patil_p

घरमालक, भाडेकरूंच्या न्यायालयाच्या फेऱया टळणार

Patil_p

अनिल देशमुखांच्या वकिलाला सीबीआयकडून अटक

Abhijeet Shinde

महाराष्ट्र प्रकरणी सुनावणी पुन्हा लांबणार

Patil_p

मराठा आरक्षण : भाजपाने सत्ता असताना आवश्यक ती पुर्तता केली असती तर आज ही परस्थिती नसती : आ. अरुण लाड

Abhijeet Shinde

कोळसा टंचाईमुळे ‘बत्ती गुल’चे संकट

Patil_p
error: Content is protected !!