Tarun Bharat

मराठा आरक्षणासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अनपेक्षित आणि निराश करणारा : उपमुख्यमंत्री

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई :


सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात आज दिलेला निर्णय अनपेक्षित, अनाकलनीय, निराश करणारा आहे. राज्य सरकार आणि मराठा समाज संघटनांनी न्यायालयात बाजू भक्कमपणे मांडली. मागील भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळातील कायदेतज्ञांच्या जोडीने नवीन तज्ञ वकिलांची फौज आपण न्यायालयात उभी केली. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आणि शिफारस असूनही असा निर्णय येणे धक्कादायक आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. 


देशातील अन्य राज्यात आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांच्या पुढे असतानाही मराठा आरक्षणासंदर्भात त्याचा विचार न होणे हे आकलनापलिकडचे आहे. मराठा बांधवांच्या प्रदीर्घ, संयमी, ऐतिहासिक संघर्षाला सर्वोच्च न्यायालयात यश मिळेल, अशी आमची खात्री होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करून राज्य सरकार आपली पुढील भूमिका निश्चित करेल. मात्र सर्वोच्च न्यायालयाने जे नाकारले, त्याची भरपाई शक्य त्या सर्व मार्गांनी करून देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न राहील. मराठा बांधवांना न्याय आणि त्यांचा हक्क देण्यासाठी राज्य सरकारला जे शक्य आहे ते सर्व केले जाईल. मराठा बांधवांच्या मनातील अन्यायाची भावना दूर करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न राज्य सरकार करेल, असेही अजित पवार म्हणाले.

  • शक्य आहे ते सर्व करणार 


राज्यातील कुठल्याही समाज घटकावर अन्याय होऊ देणार नाही. मराठा समाजाने आजवर शांततापूर्ण, संयमी, लोकशाही मार्गाने आपला लढा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही हीच भूमिका कायम ठेवावी. कोरोना संकटकाळात समाजबांधवांचा जीव धोक्यात न घालणे, कोरोनापासून सर्वांच्या जीविताचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. मराठा समाजबांधवांना न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी राज्य सरकार यापुढेही शक्य ते प्रत्येक पाऊल उचलेल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

Related Stories

योगी आदित्यनाथ यांचे सरकारी निवासस्थान बॉम्बने उडवण्याची धमकी, सुरक्षेत वाढ

Tousif Mujawar

गारगोटीत कंत्राटदाराची कार फोडून जीवघेणा हल्ला

Abhijeet Khandekar

नोएडाचे भाजपाचे आमदार पंकज सिंह कोरोना पॉझिटिव्ह

datta jadhav

राणेंच्या अडचणी वाढणार; एसीबीने दिले चौकशीचे आदेश

datta jadhav

“भारत २०१४ पासून अमेरिकेचा गुलाम”; काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

Archana Banage

कडक लॉकडाऊनची आज घोषणा?; मुख्यमंत्री आज साधणार जनतेशी संवाद

Archana Banage
error: Content is protected !!