मुंबई \ ऑनलाईन टीम
मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा महाराष्ट्र सरकारचा ‘सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग कायदा २०१८’ सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने बुधवारी रद्द ठरवला. यावर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणासाठी आपल्याकडे अजूनही मार्ग खुला आहे. आरक्षणाचा लढा अद्याप संपलेला नाही. त्यामुळे मराठा समजाने कोणाच्याही चिथावणीला बळी पडू नये, असं ते एका आजोयित पत्रकार परिषदेत म्हणाले.
आपल्याकडे आरक्षणासाठी आजूनही दरवाजा खुला आहे. केंद्र सरकारच्या मागास आयोगाकडे कागदपत्रं सोपवता येतील. त्यानंतर केंद्र सरकार, राष्ट्रपती आणि राष्ट्रीय मागास आयोग यांच्या मदतीने मराठा आरक्षणाचा मुद्दा हा मार्गी लावता येईल असं यावेळी अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. त्यामुळे कोणाच्या चिथावणीला बळी पडू नका संयम बाळगा असं आव्हान यावेळी अशोक चव्हाणांनी मराठा समाजाला केलं आहे.
तसेच, मला फडणवीस यांना विनंती करायची आहे, कृपया आपल्या बद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे. आपणही आपल्या पक्षातील लोकांना सूचना कराव्यात. महाराष्ट्र शांत आहे, परंतु चिथवण्याचं काम जे कुणी करत असतील, त्या सहकाऱ्यांना आपण सांगितलं पाहिजे. सर्वोच्च न्यायलयाच निर्णय पाहता, आपल्याला पुढचं पाऊल टाकण्यासाठी सज्ज व्हायचं आहे. असं अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.

