Tarun Bharat

मराठा आरक्षणासाठी कोडोलीत शांततेच्या मार्गाने रास्ता रोको : दलित महासंघाचा पाठिंबा

वारणानगर / प्रतिनिधी

पन्हाळा तालुक्यातील कोडोली – बोरपाडळे राज्यमार्गावर कोडोली एमएसईबी फाटा येथे मराठा समाजासाठी आरक्षण मिळावे यासाठी शांततेच्या मार्गाने रास्ता रोको करण्यात आला यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आखिल भारतीय दलित महासंघाचा पांठीबा असल्याचे संस्थापक अध्यक्ष गौतम कांबळे यानी जाहीर केले.

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, आरक्षण रद्द करणाऱ्या शासनाचा निषेध असो अशा घोषनानी परिसर दुमदुमला युवा स्वराज्य संघटनेचे संस्थापक संतोष जाधव, अध्यक्ष सुरेश पाटील यानी या रास्ता रोको संदर्भात व्यापक भूमिका स्पष्ट करीत मराठा समाजाला न्याय मिळेपर्यन्त शांततेच्या मार्गाने व कायदा व सुव्यवस्था राखत आंदोलन तीव्र करणार असल्याचे सांगीतले, निर्माण सामाजिक संस्थेचे संस्थापक जयदीप पाटील यानी मराठा समाजाला आरक्षणातून हक्क मिळावेत यासाठी सर्वानी एकत्र येवून काम करण्याचे आवाहन केले.

राज्य मार्गावर होणाऱ्या रास्ता रोको संदर्भात प्रशासनाला यापूर्वीच लेखी कळवले होते आंदोलन स्थळी सहा. पोलीस निरीक्षक शैलजा पाटील यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता पर्यायी मार्गावर वहातुक सुरू होती यातील प्रमुख आठ आंदोलकांना पोलीसानी ताब्यात घेवून काही वेळाने सोडून दिले.


Related Stories

स्वदेशीचा वापर करा, चिनी वस्तू हद्दपार करा

Archana Banage

बाजार समितीत पाहुणचार बंद

Archana Banage

अंगारकी चतुर्थीला सिद्धीविनायक, दगडूशेठ मंदिर बंद

Tousif Mujawar

पालिका निवडणूक स्वबळावर लढवणार

Patil_p

भिवंडी दुर्घटनेतील मृतांची संख्या 39 वर; बचावकार्य सुरु

Tousif Mujawar

कोल्हापूर : मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला न्याय द्यावा

Archana Banage
error: Content is protected !!