Tarun Bharat

मराठा आरक्षणासाठी मागे हटणार नाही !

प्रतिनिधी / मुंबई

मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी राज्य सरकार तसूभरही मागे हटणार नाही. हा लढा आपल्या सर्वांचा आहे. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जे जे काही करता येईल ते सर्व करू, अशी रोखठोक भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मांडली.

राजकारणासाठी मराठा समाजाला भडकाविण्याचे तसेच आगी लावण्याचेही काम होते आहे. मात्र हे आपण सहन करणार नाही, असा इशाराही मुख्यमंर्त्यांनी बैठकीत दिला.

सर्वोच्च न्यायालयाने शिक्षण आणि शासकीय नोकरीतील मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्य सरकारकडून यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यापूर्वी मराठा समाजातील विविध संघटनांचे प्रतिनिघी, आरक्षणाच्या बाजूने लढलेली वकील मंडळी, अभ्यासक आणि जाणकारांशी चर्चा करण्यात आली.

त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. आम्ही सर्व संबंधितांना विश्वासात घेऊन, त्यांच्या सूचनांचा विचार करणार आहोत. विरोधी पक्ष नेत्यांशी देखील या विषयावर सविस्तर चर्चा होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.यावेळी आरक्षणावरून होत असलेल्या राजकारणाविषयी उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. सरकार या प्रश्नी सुरुवातीपासून प्रामाणिक आहे आणि तळमळीने हा प्रश्न सोडवू इच्छिते. पण राजकारणासाठी मराठा समाजाला भडकविण्याचे आणि आगी लावण्याचे काम होत असून हे आपण सहन करत कामा नये, असे ठाकरे सांगितले.यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे सदस्य एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, अनिल परब, दिलीप वळसे पाटील, राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, ज्येष्ठ विधिज्ञ विजयसिंग थोरात आदी उपस्थित होते.

Related Stories

निम्म्या कोल्हापूरचा पाणीपुरवठा सोमवारी बंद

Archana Banage

अभिनेत्री कंगना राणावतचा शिवसेनेच्यावतीने निषेध

Archana Banage

महाराष्ट्रात 15,591 नवे कोरोना रुग्ण; 424 मृत्यू

Tousif Mujawar

कोरोना आणि अन्य आजाराच्या रुग्णांवर वेळेत उपचार करा : नवल किशोर राम

Tousif Mujawar

मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ निर्णयाचे मनसेकडून स्वागत

Tousif Mujawar

आज ‘चाणक्य’ लाडू खात असले तरी…; अभिनेते प्रकाश राज यांचे उद्धव ठाकरेंसाठी ट्वीट

Archana Banage