Tarun Bharat

मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंनी घेतली शरद पवार, राज ठाकरेंची भेट

Advertisements

मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी एकत्रित या : खासदार संभाजीराजेंचे सर्व पक्षीय नेत्यांना आवाहन

प्रतिनिधी / मुंबई, कोल्हापूर

मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका राज्यव्यापी दौरा करणाऱया खासदार संभाजीराजे यांनी गुरूवारी राजधानी मुंबईत गाठीभेटीची मोहीम राबववली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेऊन संभाजीराजे यांनी त्यांच्याशी खलबते केली. मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळवून देण्यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एकजुटीने लढय़ात सहभागी व्हावे, असे आवाहनही संभाजीराजे यांनी केले. दरम्यान, संभाजीराजे आज शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, वंचित बहुजन आघाडीचे नेते अŸड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन चर्चा करणार असून त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर करणार आहेत.

‘सिल्व्हर ओक’वर शरद पवार यांची भेट

पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ, मराठावाडय़ातील जिल्हय़ातील मराठा आरक्षण लढय़ातील कार्यकर्ते, पदाधिकारी, विचारवंत यांच्याशी संवाद साधल्यानंतर संभाजीराजे गुरूवारी मुंबईत दाखल झाले. सकाळी ‘सिल्व्हर ओक’ बंगल्यावर जाऊन त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत मराठा आरक्षणासंदर्भात उभय नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. या भेटीनंतर माहिती देताना संभाजीराजे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठीच्या या लढय़ात आपण पुढाकार घ्यावा, असे आवाहन पवारसाहेबांना केले. त्यांनी सकारात्मक भूमिका घेत प्रतिसाद दिल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.

‘कृष्णकृंज’वर राज ठाकरे यांच्याबरोबर चर्चा

शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर संभाजीराजे थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी कृष्णकुंज या निवासस्थानी पोहचले. या भेटीत संभाजीराजे यांनी राज्यभरातील मराठा समाजाच्या भावना मांडल्या. गरीब मराठय़ांना आरक्षणाची कशी गरज आहे. त्यासाठी आपण सर्वांनी कशा पद्धतीने पुढाकार घेण्याची गरज ही बाब ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिली. या भेटीनंतर राज ठाकरे स्वत निवासस्थानाच्या दारापर्यंत संभाजीराजे यांना निरोप देण्यासाठी आले. भेटीतील चर्चेविषयी माहिती देताना संभाजीराजे म्हणाले, राज ठाकरे जात पात मानत नाहीत हे मला माहित आहे. गरीब मराठा समाजाला आरक्षणाची कशी गरज आहे? हे मी त्यांना समजून सांगितले. राज्यातील मराठा समाजाच्या भावना, स्थिती विषद केली. ठाकरे यांनी माझ्या भूमिकेशी सहमती दर्शवत पाठिंबा दिला.

राजर्षी शाहू महाराज आणि प्रबोधकार ठाकरे

आपले पणजोबा राजर्षी शाहू महाराज आणि राज ठाकरे यांचे आजोबा प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांच्यातील नाते आणि या दोघांची बहुजन समाजाच्या विकासाविषयी असणारी तळमळ सारा महाराष्ट्र जाणतो. छत्रपती घराण्याचे ठाकरे घराण्याची जुने नाते आहे, याची आठवण संभाजीराजे यांनी राज ठाकरे यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

संभाजीराजे आज काय सांगणार?, अखंड महाराष्ट्रात उत्सुकता

संभाजीराजे आज शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यांना मराठा समाजाच्या व्यथा, वेदना आणि भावना सांगणार आहेत. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार आहे. संभाजीराजे कोणती भूमिका मांडणार, काय सांगणार?, काय बोलणार? या विषयी संपूर्ण मराठा समाजाससह महाराष्ट्रात उत्सुकता आहे.

संभाजीराजे-पवार भेटीवर मेटेंची टीका

संभाजीराजे यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यावर शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी टीका केली आहे. पवार यांनी आजवर मराठा आरक्षणात कोणतेही भूमिका, पुढाकार घेतलेला नाही. त्यामुळे संभाजीराजे यांनी त्यांची घेतलेली उपयुक्त ठरणार नाही, असे मेटे यांनी म्हटले आहे. तर मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी आरक्षणासाठी पवारसाहेबांसारख्या अनुभवी नेत्यांची ताकद महत्वाची ठेरल, असे म्हटले आहे.

Related Stories

वळसे येथे महामार्गावर थरारक अपघात, भरधाव स्विफ्टने तीन दुचाकींना उडवले

Archana Banage

कडेगाव शहरात कोरोनाचा शिरकाव

Archana Banage

सुनील तटकरेंनी घेतला गीतेंचा खरपूस समाचार; म्हणाले…

datta jadhav

मुख्यमंत्री ठाकरेंचा एकाचवेळी ३०० ‘पॉवरफुल्ल’ अधिकाऱ्यांना झटका

Archana Banage

राजू शेट्टींनी पीक विमा कंपनीची बोगसगिरी आणली उघडकीस

Archana Banage

रत्नागिरीत झालेल्या 60 व्या महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेत मुंबईचे ‘सुवर्णतुला’ प्रथम

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!