Tarun Bharat

मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणासह अनेक मुद्द्यांवर चर्चा, पंतप्रधानांकडून सकारात्मक निर्णयाची आशा : मुख्यमंत्री


नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम

मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी यांच्या सोबत झालेल्या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मराठा आरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण, पदोन्नतीमधील आरक्षण, मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गमधील जागा, जीएसटी परतावा आणि पीकविम्याच्या अटी-शर्ती, चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या किनारपट्टी भागातील नुकसानीचे एनडीआरएफचे निकष, मराठी भाषेला अभिजात दर्जा देणं या मुद्द्यांवर विस्तृत चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुद्दे ऐकून घेतले. पंतप्रधान हे मुद्दे सकारात्मक पद्धतीने सोडवतील, अशी, आशा असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंमधील बैठक जवळपास पावणे दोन तास चालली. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, मागासवर्गीय आरक्षण, पीक विम्याचा बीड पॅटर्न, कांजूरमार्ग कारशेड मंजुरी , तोक्ते चक्रीवादळ, १४ व्या वित्त आयोगातील निधी, मराठी भाषेला अभिजात भाषेला दर्जा मिळावा, या विषयांवर नरेंद्र मोदींकडे मांडणी केली, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान शिष्टमंडळासोबतच्या अधिकृत भेटीदरम्यानच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात वैयक्तिक भेट होणार असल्याची चर्चा रंगली होती. त्याविषयी सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधानांसोबत वैयक्तिक भेट झाली. सत्तेत एकत्र नसलो तरी याचा अर्थ नातं तुटलं अस होत नाही. पंतप्रधानांना भेटणं यात गैर काय? मी नवाज शरीफ यांना भेटायला गेलो नव्हतो, आपल्याच पतंप्रधानांची भेट घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत या मुद्द्यांवर चर्चा झाली.

मराठा आरक्षणाबाबत केंद्राने भूमिका घ्यावी

इतर मागासवर्गीयांचं राजकीय आरक्षण

मागासवर्गीयांचं पदान्नतीमधील आरक्षण

केंद्राकडून मिळणारा जीएसटीचा परतावा वेळेत मिळावा

पीकविमा अटी-शर्तींचं सुलभीकरण – बीड मॉडेल

मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गच्या जागेची उपलब्धता

नैसर्गिक आपत्तीबाबत मदतीसाठी एनडीआरएफचे निकष बदलणे

राज्यात बल्क ड्रग पार्क तयार करणं – स्पर्धात्मक निविदेस मंजुरी

चौदाव्या वित्त आयोगातील थकीत निधी मिळावा (पंचायत राज ससंस्था)

चौदाव्या वित्त आयोगातील थकीत निधी मिळावा (शहरी स्थानिक)

चौदाव्या वित्त आयोगातील थकीत निधी मिळावा (पंचायत राज ससंस्था)

राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची निवड

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा


Related Stories

नेपाळच्या विदेशमंत्र्यांनी घेतली संरक्षणमंत्री राजनाथ यांची भेट

Patil_p

सैनिक स्कुलमध्ये जिल्हय़ातील चार विद्यार्थीनींना प्रवेश

Patil_p

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांना कोरोनाची बाधा

Tousif Mujawar

दिव्यांगांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्नशील

Patil_p

केरळच्या मुख्यमंत्रिपदी पिनराई विजयन शपथबद्ध

Amit Kulkarni

जम्मू : कोरोनामुळे यंदाही अमरनाथ यात्रा रद्द

Tousif Mujawar