Tarun Bharat

मराठा आरक्षणप्रश्नी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा

मराठा समाज आरक्षण व कोरोना महामारी विषयी विशेष संसदीय अधिवेशन बोलवावे,अशी मागणी राष्ट्रपती रामनाथ कोविंद व लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्याकडे पत्राव्दारे खासदार धैर्यशील माने यांनी केली आहे.

प्रतिनिधी / कोल्हापूर

 खासदार माने यांनी पत्रामध्ये म्हटले आहे की सध्या संपूर्ण देश कोरोनाच्या महामारीचा सामना करत असताना मराठा आरक्षणाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अतिशय निराशाजनक लागला. त्यामुळे मराठा समाजामध्ये प्रचंड प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. मराठा समाजातील तळागाळातील वंचित असणाऱया तरुण-तरुणींच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या युवा वर्गांच्या भावनाही तीव्र आहे. त्यामुळे त्यांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. याची तीव्रता आणि गंभीरता लक्षात घेऊन महाराष्ट्रामध्ये असणाऱया एकूण लोकसंख्येच्या 32 टक्के मराठा समाज आणि या समाजातील उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आरक्षणाची त्यांना नितांत गरज आहे.

राज्य शासन त्यासाठी आपल्या परीने योग्य ते प्रयत्न करत आहे. पण आता सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय झाल्यामुळे केंद्र शासनाने हस्तक्षेप करून मराठा समाजाला न्याय देण्यासाठी राष्ट्रपतींनी मराठा समाज आरक्षण विषयावर व कोरोना महामारीबाबत विशेष अधिवेशन बोलवण्याची आवश्यकता आहे. एका बाजूला कोरोना महामारीमुळे देशामध्ये असणारा ऑक्सिजनचा असणारा प्रचंड तुटवडा यामुळे महाराष्ट्रातील जनता त्रस्त आहे. दुसऱया  बाजूला मराठा आरक्षणामुळे हवालदिल झालेला तरुण रस्त्यावर उतरेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचे संकट रोखत असताना या दोन्ही प्रश्नांवर मार्ग काढणे आवश्यक आहे. त्यासाठी विशेष संसदीय अधिवेशन बोलवून प्रश्न मार्गी लावावेत, असेही पत्रात म्हटले आहे.

Related Stories

हळदीचे लिलाव ऑनलाईन पद्धतीने करा -जिल्हाधिकारी

Archana Banage

किसन वीर मध्ये ऐश्वर्या डेरेंचा सत्कार

Patil_p

पर्यटन व तिर्थक्षेत्र तसेच जिल्हाबंदीबाबत योग्य निर्णय घ्यावा

Patil_p

लॉकडाऊन काळात शालेय फी जमा करण्यासाठी सक्ती करू नये – वर्षा गायकवाड

Archana Banage

आमदार जयश्री जाधव यांचा पूरग्रस्त भागातील नागरिकांशी संवाद

Kalyani Amanagi

अदर पूनावाला यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी

Tousif Mujawar