Tarun Bharat

मराठा आरक्षण : सांगलीत मराठा स्वराज्य संघाच्यावतीने निदर्शने

Advertisements

प्रतिनिधी / सांगली

मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण केंद्र सरकारकडूनच मिळणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हे आरक्षण तात्काळ द्यावे, या मागणीसाठी मराठा स्वराज्य संघ यांच्या वतीने मंगळवारी जुने स्टेशन चौक येथील महात्मा गांधी पुतळा समोर निदर्शने करण्यात आली.

यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण मिळावे ही मागणी यावेळी करण्यात आली. भाजपाकडून जाणून बुजून या आरक्षणाबाबत उलट सुलट मत व्यक्त केले जाते. पण केंद्राकडूनच मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे. केंद्र सरकारने घटनेत बदल करून ते दिले, तरच ते आरक्षण टिकणार आहे. त्यामुळे हे आरक्षण केंद्राकडून तात्काळ देण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. स्वराज्य संघाचे प्रमुख महादेव साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य संघाच्या पदाधिकाऱ्यांनी हे आंदोलन केले.

Related Stories

सांगली : सरपंच आरक्षणाची सोडत 29 रोजी : तहसीलदार सचिन लंगुटे

Abhijeet Shinde

परस्पर जमीन खरेदी विक्री प्रकरणातील आरोपी घाडगेला अटक

Abhijeet Shinde

सांगली : चांदोली धरणातून विसर्ग वाढवल्याने २ पूल पाण्याखाली

Abhijeet Shinde

सांगली जिल्हय़ात नवे ८३० रूग्ण, ३६ बळी

Patil_p

मिरजेतील डि मार्ट मॉलला 20 हजारांचा दंड

Abhijeet Shinde

मिरजेत कोरोना नियमांचा भंग करणाऱ्या 29 जणांवर गुन्हा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!