Tarun Bharat

मराठा क्रांती मोर्चाची आज मुंबईत महत्वपूर्ण बैठक

प्रतिनिधी / मुंबई


सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती देण्याचा निर्णय बुधवारी दिला. तसेच पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व याचिका व दावा वर्ग केला. आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राज्यातील मराठा समाजातून तीव्र भावना व्यक्त होत आहे. महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठविली जात आहे. आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर आता नजीकच्या काळात कोणती भूमिका घ्यायची या संदर्भात विचार विनियम करण्यासाठी शुक्रवारी (11 सप्टेंबर) सकाळी मुंबईत महत्वपूर्ण अशा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. गावदेवी येथील हरिश्चंद्र गोरेगावकर मार्गावरील शारदा हायस्कूलमध्ये (मुंबई सेंट्रल) ही बैठक होणार आहे. बैठकीला मराठा क्रांती मोर्चाचे राज्यातील सर्व जिल्हा समन्वयक उपस्थित राहणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठा समाजाचे शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षण तूर्तात स्थगित झाले आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांबरोबर इतर परीक्षांची तयारी करणाऱया मराठा युवक, युवतीत प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. काही जणांची वयोमर्यादाही संपण्याची भीती असल्याने त्यांचे करिअरही पणाला लागले आहे. सर्वच स्तरावर मराठा समाजात अस्वस्थता, रोष पसरला असल्याने नजीकच्या काळात कोणती भूमिका घ्यायची, न्यायालयीन आणि रस्त्यावरील लढाईबाबत रणनीती ठरविण्यासाठी शुक्रवारच्या मुंबईतील महत्वपूर्ण बैठकीत निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

बैठकीला राजेंद्र कोंडरे, दिलीप पाटील, आबा पाटील, वीरेंद्र पवार, संजीव भोर, करण गायकर, बापू क्षीरसागर, प्रवीण पाटील, शिवानंद भानुसे, वेताळमामा, दाते पाटील, संतोष गवाणे पाटील यांच्यासह राज्यातील विविध जिल्हय़ातील समन्वयक उपस्थित राहणार आहेत. विदर्भातील समन्वकांना उपस्थित राहणे शक्य नसल्याने त्यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सवरून संवाद साधला जाणार असल्याची माहिती क्षत्रिय मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष तथा याचिकाकर्ते दिलीप पाटील यांनी दिली. बैठकीबाबत राज्यातील सर्वांना निमंत्रण पाठविले आहे. तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.

Related Stories

ईडीने जप्त केलेल्या डीएसकेंच्या बंगल्यात चोरी

datta jadhav

चिंताजनक : महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांनी ओलांडला 10 लाखांचा टप्पा

Tousif Mujawar

…तर माफीचे साक्षीदार बनून सगळं उघड करू

datta jadhav

सांगली : मणेराजूरीत चोरट्यांचा धुमाकूळ

Archana Banage

पाच हजारपेक्षा जास्त पत्रकारांच्या आरोग्य तपासणीचा राष्ट्रीय विक्रम

Archana Banage

शिर्डी संस्थानचे विश्वस्त मंडळ न्यायालयाकडून बरखास्त

datta jadhav