Tarun Bharat

मराठा जागृती निर्माण संघातर्फे पालकांचा सत्कार

प्रतिनिधी/ बेळगाव

मुलांना मातृभाषेतच शिक्षण देणे आवश्यक आहे. त्या दृष्टिने प्रियंका कळसकर व अमित कळसकर तसेच सोनाली व जयदीप बिर्जे यांनी आपल्या मुलांना परिणीती व श्रीशा यांना मराठी शाळेत घातले. त्याबद्दल त्यांचा सीए वनिता बिर्जे व मराठा जागृती निर्माण संघाचे संघ प्रमुख गोपाळराव बिर्जे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

शुक्रवार पेठ येथील लिओ इंजिनिअर्सच्या कार्यालयात हा कार्यक्रम झाला. मातृभाषेतून शिक्षण घेतल्याने मुलांना चटकन आकलन होते व त्यांची कुचंबना होणार नाही, असे गोपाळराव बिर्जे म्हणाले. याप्रसंगी कदम, वेदांत बिर्जे, सौरभ बाळेकुंद्री, विजय राजगोळकर आदी उपस्थित होते. श्रद्धा लोहार यांनी आभार मानले.

Related Stories

म. ए. समिती सुरू करणार कोविड आयसोलेशन सेंटर

Tousif Mujawar

कर्नाटक दलित संघर्ष समिती जिल्हाध्यक्षपदी महांतेश तळवार

Amit Kulkarni

दुहेरी खूनप्रकरणी सहा जण ताब्यात

Amit Kulkarni

2019 मध्ये घरे कोसळलेल्यांना नुकसान भरपाईच नाही

Amit Kulkarni

राजहंसगडावरील शिवपुतळय़ाबाबत दबावतंत्र

Patil_p

रक्ताअभावी ओढवला कुत्र्याचा मृत्यू

Amit Kulkarni