Tarun Bharat

मराठा बँकेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

बेळगाव

बसवाण गल्ली येथील मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेतर्फे सभासदांच्या गुणी विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ पार पडला. यावेळी बँकेचे चेअरमन दिगंबर पवार, संचालक बाळासाहेब काकतकर, शेखर हंडे, बी. एस. पाटील, विनोद हंगिरकर, रेणू किल्लेकर उपस्थित होते.

यावेळी काजल अनिल शिंदे या गुणवंत विद्यार्थिनीचा सत्कार बँकेचे चेअरमन दिगंबर पवार तर सायली सुनील शिंदे हिचा सत्कार माजी चेअरमन बाळासाहेब काकतकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, पुष्पगुच्छ व रोख रक्कम देऊन करण्यात आला.

प्रारंभी बाळासाहेब काकतकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी दिगंबर पवार व बाळासाहेब काकतकर यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन पांडुरंग जाधव यांनी केले. तर व्यवस्थापक गजानन हिशोबकर यांनी आभार मानले.

Related Stories

माध्यमिक विभागाची सहामाही परीक्षा उद्यापासून

Amit Kulkarni

शेतकऱयांनी मोबाईल ऍपवर पीक नोंद करावी

Patil_p

मळणीच्या ताडपत्र्या विक्रीसाठी दाखल

Patil_p

भीम अन् वासुदेवाची टोळी; ज्यांनी घेतला भावाचाच बळी

Amit Kulkarni

मारहाण प्रकरणी तिघा जणांना अटक

Patil_p

चोरटय़ांकडून ग्रामीण भागातील मंदिरांना लक्ष्य

Patil_p