Tarun Bharat

मराठा बँकेतर्फे सभासदांना कोरोना लस

प्रतिनिधी / बेळगाव

मराठा को-ऑप. बँकेच्यावतीने सभासदांना जागतिक आरोग्यदिनाचे औचित्य साधून कोरोना लस (कोविड शिल्ड) देण्यास प्रारंभ केला आहे.

यावेळी बँकेचे चेअरमन दिगंबर पवार म्हणाले, कोरोनाचा प्रभाव पुन्हा वाढत असून यासाठी प्रतिकारशक्ती वाढविणे गरजेचे आहे. बँकेच्या सभासदांना कोरोना प्रतिबंधक लस (कोविड शिल्ड) केएलई हॉस्पिटलतर्फे देण्यास सुरुवात झाली आहे. याकरिता बँकेपासून केएलई हॉस्पिटलपर्यंत सभासदांना नेण्याची क्यवस्था करण्यात येत आहे. सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे असल्यास डॉक्टरांशी सल्ला मसलत करावी. तसेच सभासदांनी याची दखल घेऊन बँकेकडे नावे नोंद करावीत, असे कळविले आहे.

याप्रसंगी बँकेचे संचालक एल. एस. होनगेकर, बी. एस. पाटील, शेखर हंडे, विनोद हंगिरकर, लक्ष्मण नाईक, जनरल मॅनेजर जी. एम. हिशोबकर व सभासद उपस्थित होते.

जागतिक आरोग्य दिनानिमित्त बुधवारी केएलई हॉस्पिटलमध्ये कोरोना सतर्कतेबद्दल कार्यक्रम पार पडला. यावेळी दीपप्रज्वलन बँकेच्या व्हा. चेअरमन नीना काकतकर, संचालिका माजी उपमहापौर रेणू किल्लेकर यांच्या हस्ते झाले. त्यानंतर या उपक्रमाला चालना देण्यात  आली.

Related Stories

आता रात्री 10 ते पहाटे 5 नाईट कर्फ्यू

Amit Kulkarni

बेंगळूर: क्रिकेट सट्टेबाजी प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल निलंबित

Archana Banage

हायकमांडने सूचना दिल्यास राजीनामा

Amit Kulkarni

कर्नाटक: माजी आयएएस अधिकारी शशिकांत कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार

Archana Banage

बेंगळूर : अभिनेत्री रागिनी द्विवेदीला सीसीबी पोलिसांकडून अटक

Archana Banage

लॉकडाऊनऐवजी कठोर नियम जारी करा

Amit Kulkarni