Tarun Bharat

मराठा मंदिरतर्फे पंतप्रधान निधीला लाखाचा निधी

प्रतिनिधी / बेळगाव :

येथील मराठा मंदिर ट्रस्टच्यावतीने कोरोना लढाईसाठी मदत म्हणून पंतप्रधान निधीला 1 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे. गरजूंना आवश्यक धान्य सामग्रीचे वितरण करण्यात आले. मराठा मंदिर येथे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पालन करून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पाहुणे म्हणून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, आमदार अनिल बेनके, मराठा मंदिरचे अध्यक्ष शिवाजी हंगिरगेकर, चंद्रकांत गुंडकल, अप्पासाहेब गुरव, नेताजी जाधव, बाळासाहेब काकतकर, नेमिनाथ कंग्राळकर, लक्ष्मणराव सैनुचे, दिनकर घोरपडे आदी उपस्थित होते. मराठा मंदिरने कोरोनाच्या लढाईत दिलेल्या या योगदानाबद्दल उपस्थित मान्यवरांनी प्रशंसोद्गार काढले. 

Related Stories

आता महाराष्ट्राच्या उपराजधानीला विमानसेवा

Amit Kulkarni

‘चिकोडी-निपाणी’ सर्व बंधारे पाण्याखाली

Patil_p

अंगणवाडी पोषक आहाराला भ्रष्टाचाराची कीड

Omkar B

कारवार जिल्हय़ातील शिवमंदिरे महाशिवरात्रीसाठी सज्ज

Amit Kulkarni

कुडचीत हायअलर्ट, प्रशासन दक्ष

Patil_p

पेट्रोल, डिझेलसह गॅसचे दर कमी करा

Amit Kulkarni