Tarun Bharat

मराठा वसतिगृहाचे काम त्वरीत सुरु व्हावे; अन्यता बेमुदत उपोषण

Advertisements

प्रतिनिधी / सांगली

सांगली जिल्ह्याचे ठिकाण म्हणून सांगलीमध्ये मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह वाढण्याचे काम तातडीने सुरू करण्यात यावे अशी मागणी शनिवारी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे करण्यात आली. मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाची दखल घेऊन महाराष्ट्र शासन खड्बुडून जागे झाले, मराठा समाजाची प्रमुख मागणी पैकी जिल्ह्याच्या ठिकाणी मुला ,मुलींचे वसतिगृह व्हावे, ग्रामीण भागातील शिक्षण घेणाऱ्या मुला, मुलींना जिल्ह्याच्या ठिकाणी सर्व सोयीयुक्त सुसज्ज असे वसतिगृह असावे. त्यासाठी सांगली येथील जागा शासनाची असून तसा प्रस्ताव १६ ऑगष्ट २०१८ समन्वयक-अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, सांगली. यांच्यामार्फत पाठवण्यात आला. हा प्रस्ताव धूळ खात पडला आहे.

तत्कालीन जिल्हाधिकारी कळम-पाटील तसेच निवासी जिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांनी प्रस्ताव तयार केला होता, त्यामध्ये मराठा मुला मुलींचे वसतिगृह, मल्टीपर्पज हॉल, अण्णासाहेब पाटील महामंडळ ऑफीस, सारथी ऑफिस, डॉ.पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना, गुणवंत परदेशी मुलांनसाठी शिष्यवृत्ती, मराठा उद्योजक महिलांसाठी उत्पादन ट्रेनिंग व पँकिंग व्यवस्था, असे सर्व एका छता खाली मिळणार आहे. महाराष्ट्रातील पहिला पायलट प्रोजेक्ट आहे, या साठी जिल्हा नियोजन मधून ५० लाखाची तरतूद सुद्धा झाली आहे.तसा शासन निर्णय झाला आहे. या विषयावर मराठा मोर्चे निघूनही शासन गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. युवराज संभाजी छत्रपती यांच्या उपोषणा नंतर लेखी आश्वासन देण्यात आले. तात्पुरते बांधकाम विभागा कडून वसतिगृहाची चाचपणी करून बंद पडलेल्या इमारतीमध्ये हे वसतिगृह येत्या गुडीपाडव्याला सुरु करू व जिल्हाधिकारी त्यावर नियोजन करतील असे आश्वासन देण्यात आले होते.

सदर प्रस्तावात बदल करून ही जागा अण्णासाहेब पाटील महामंडळ च्या ऐवजी ‘सारथी’ च्या माध्यमातून विकासीत करून सांगलीजिल्हा मधील कायमस्वरूपी वसतिगृह हे कत्तलखाना जवळ, गंजीखाना सांगली येथे होणार असून त्याचा योग्य पाठपुरावा कायदेशीर करून त्वरीत अंमलबजावणी व्हावी व तात्पुरत्या स्वरूपातील वसतीगृह येत्या गुडीपाडव्याला सुरु करण्याच्या दृष्टीने गवळी गल्ली येथील गणपती मंदीर मागे जुनी ५ नंबर शाळा मध्ये सुरु करून मराठा समाजातील मुलांना ही शांत व नैसर्गिक जागा उपलब्ध करण्यासाठी आयुक्त यांना सूचना जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिल्या आहेत.

बैठकीला खासदार संजय पाटील यांनी सारथी व्यवस्थापकीय संचालक याचे सोबत लवकरच बैठक घेऊन हा विषय मार्गी लावणार असल्याचे सांगितले. बैठकीत सर्व कायदेशीर बाबींवर चर्चा झाली. या वेळी श्रीकांत शिंदे, हणमंत पवार, यांनी आयुक्त व महापौर यांची सोमवारी भेट घेऊन तात्पुरत्या वसतीगृहाची चाचपणी करून सर्व तयारी गुडीपाडव्या पर्यंत करण्यात येईल तसेच प्रशासनाला सर्व सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली.अशी माहिती सर्जेराव पाटील माजी समन्वयक अण्णासाहेब पाटील महामंडळ, यांनी दिली.

Related Stories

शिराळा पोलिसांकडून एका महिन्यात दुसरी आंतरराज्य टोळी जेरबंद

Abhijeet Shinde

सांगली : मनपा क्षेत्रात सहा नवे रूग्ण ,तर जिल्ह्यात 222 कोरोनामुक्त

Abhijeet Shinde

दिघंची सरपंच,उपसरपंच पतीसह चार कर्मचारी पॉझिटिव्ह,शहर बनले हॉटस्पॉट

Abhijeet Shinde

शेतकरी विरोधी कृषी कायद्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन

Abhijeet Shinde

सत्तेसाठी नाराज होणारा मी नाही – आ. अनिलभाऊ बाबर

Abhijeet Shinde

सांगली : राष्ट्रवादीचे नेते मनोहर पाटील यांची हत्या

prashant_c
error: Content is protected !!