Tarun Bharat

मराठा संस्कृती संवर्धन संघटनेच्यावतीने रक्तदान शिबिर

प्रतिनिधी/ बेळगाव

मराठा संस्कृती संवर्धन संघटनेच्यावतीने शनिमंदिर जवळील सेवक शॉपी येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी डॉ.नम्रता देसाई यांच्याहस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. आपल्या समाजासाठी सर्वाचे योगदान आवश्यक आहे, यामुळे सर्वानी आपल्या परीने रक्तदान करावे असे आवाहन केएलई रक्तपेढीचे प्रमुख डॉ. विठृल माने यांनी केले. याप्रसंगी 50 हून अधिक युवकांनी रक्तदान केले.

 उपस्थितांचा परिचय डॉ. मानसी देसाई यांनी करून दिला. कार्यक्रमावेळी डॉ. आनंद बी.एस. डॉ. विठृल माने, डॉ. नम्रता देसाई आदीचा संघटनेच्यावतीने शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी शिवराज पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी केएलई रूग्णालयाच्या उपस्थित वैद्यकिय अधिकारी व कर्मचाऱयांनी सहकार्य केले. याप्रसंगी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे युवा कार्यकर्ते सुजय पाटील, महेश देसाई, विनायक चव्हाण-पाटील, पवन चव्हाण-पाटील, ओंमकार चव्हाण-पाटील, निखिल कदम्ब-पाटील, राहुल कदम्ब-पाटील, यांनी प्रयत्न केले.

 

Related Stories

मनरेगामध्ये काम करणाऱया महिलांना कामगार कार्ड द्या

Amit Kulkarni

बेळगावात कोरोनाचा पहिला बळी

Patil_p

यंदा परिवहनच्या ऑक्टोबर सिझनवरही पाणी

Patil_p

कैदी गिरवताहेत रंगकामाचे धडे

Amit Kulkarni

बसचालक-प्रवाशांमध्ये वाद; महामार्गावर वाहतूक कोंडी

Amit Kulkarni

तरुण भारत सर्वसामान्य जनतेचा आवाज

Omkar B