Tarun Bharat

मराठा समाजाचे 15 रोजी सुवर्णसौधसमोर भव्य आंदोलन

Advertisements

आरक्षणासह मंत्रिपद देण्याची मागणी : उत्तर कर्नाटकातील समाज एकवटणार

प्रतिनिधी/ बेळगाव

कर्नाटकात 50 लाखांहून अधिक संख्येने मराठा समाज आहे. परंतु आजवर राज्य सरकारने केवळ मतदानापुरतेच पाहिले आहे. या समाजाला आरक्षण नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विधानसभा व विधानपरिषदेत मिळून सहा आमदार असतानाही या समाजाच्या एकालाही मंत्रिपद देण्यात आलेले नाही. या अन्यायाविरोधात बुधवार दि. 15 रोजी सकाळी 10 वा. सुवर्ण विधानसौधसमोर उत्तर कर्नाटकातील मराठा समाज आंदोलन करणार असल्याचे कर्नाटक क्षत्रिय मराठा फेडरेशनचे अध्यक्ष शामसुंदर गायकवाड यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

शंकरप्पा आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा समाजाला 3 बी मधून 2 ए मध्ये आरक्षण मिळावे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी बसवकल्याण लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा विकास महामंडळाची घोषणा केली. याला अनेक दिवस उलटले तरी अद्याप कार्यकारिणीची निवड अथवा कोणताही निधी मिळालेला नाही. केवळ मते मिळविण्यासाठीच हा प्रयत्न होता, असा घणाघात पत्रकार परिषदेत करण्यात आला.

मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या कार्यकाळात कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांना मंत्रिपद देण्यात आले होते. परंतु नव्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान देण्यात आलेले नाही. हा मराठा समाजाचा अपमान आहे. पाच आमदार व एक विधानपरिषद सदस्य मराठा समाजाचे असतानाही एकही मंत्रिपद समाजातील सदस्याला देण्यात आलेले नाही. समाजाची ही नाराजी दूर करून श्रीमंत पाटील यांना मंत्रिमंडळात पुन्हा स्थान द्यावे, अशी मागणी फेडरेशनच्या उपाध्यक्षा व जि. पं. सदस्या सुमित्रा ओगळी यांनी केली.

15 रोजी होणाऱया आंदोलनामध्ये बेळगाव जिल्हय़ासह शेजारील बागलकोट, विजापूर, हुबळी, धारवाड, गदग, कारवार येथील 10 हजारहून अधिक मराठा समाजाचे पदाधिकारी व सदस्य सहभागी होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या पत्रकार परिषदेवेळी संघटनेचे मुख्य सचिव जे. डी. घोरपडे, धारवाड जिल्हा अध्यक्ष प्रकाश टिकप्पण्णावर, बेळगाव जिल्हा अध्यक्ष सुभाष कासरकर, कुंदगोळ अध्यक्ष जोतिबा खैरोजी, संकेश्वर अध्यक्ष विठ्ठल वाघमोरे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. 

Related Stories

खडकलाट येथे कोरोनाचा पहिला बळी

Patil_p

प्रत्येकामध्ये लेखनाची उर्मी असणे आवश्यक

Patil_p

‘विन्यासा’ फॅशन शो रंगतदार

Amit Kulkarni

बीडीके हुबळी, जॅनो पँथर्स गदग, हुबळी क्रिकेट अकादमी संघ विजयी

Amit Kulkarni

केपीटीसीएल कार्यालय परिसरातील रस्त्याला अखेर मुहूर्त

Patil_p

ऑनलाईन शिक्षणासाठी घ्यावा लागतो टेकडय़ांचा आधार

Amit Kulkarni
error: Content is protected !!