Tarun Bharat

मराठी-कन्नड शाळांना 8 संगणकांचे वितरण

Advertisements

प्रतिनिधी /बेळगाव

नगरसेवक शंकर पाटील व आश्रय फौंडेशनच्यावतीने बुधवारी बकरी मंडई येथील सरकारी मुलांची शाळा नं. 22 मध्ये 5 संगणक वितरित करण्यात आले. तसेच केळकर बाग येथील कन्नड शाळेलाही 3 संगणक देण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. पुढील काळात मराठी शाळांचा कॉन्व्हेंट शाळांच्या धर्तीवर विकास करण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

सरकारी शाळांमध्ये संगणक नसल्यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाविषयीची माहिती मिळत नाही. इंग्रजी शाळांमध्ये संगणक असल्यामुळे त्यांना त्याचे ज्ञान मिळत असते. सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये ही कमतरता राहू नये, या उद्देशाने नगरसेवक शंकर पाटील व एड्सग्रस्तांना मदतीचा हात देणारी संस्था आश्रय फाऊंडेशन यांच्यावतीने बकरी मंडई येथील शाळेला पाच संगणक भेट स्वरुपात देण्यात आले.

बुधवारी झालेल्या या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते संगणक शाळेच्या मुख्याध्यापकांकडून सुपूर्द करण्यात आले. या कार्यक्रमाला आश्रय फौंडेशनच्या अध्यक्षा नागरत्ना, उपाध्यक्षा अर्चना पद्मण्णावर, सदस्या कमल गादिया, ओमप्रकाश नायक, शारदा बोलमळ, संजू तळवार, श्रीजीत विजय होन्नम्मगोड इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

शाळेचे मुख्याध्यापक व गणपत गल्ली क्लस्टरचे सीआरपी जैनोजी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. भारती पाटील यांनी सूत्रसंचालन केले. किरण कुलकर्णी यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला नोडल अधिकारी भारती नरसण्णवर यासह एसडीएमसी अध्यक्षा वनिता कंग्राळकर यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.

Related Stories

नद्यांची वाटचाल धोका पातळीकडे

Patil_p

इतरांचा दुःस्वास करून स्वभाषेचा विकास अशक्य

Amit Kulkarni

शेतात ठेवलेले सोयाबिन चोरणाऱया युवकाला अटक

Omkar B

पाणीपट्टी न भरल्यास नळ जोडणी बंद करण्याचा इशारा

Patil_p

मंगळवारपेठ येथे आणखी 3 जनावरे दगावली

Amit Kulkarni

वातानुकूलित बससेवेला वाढतोय प्रतिसाद

Amit Kulkarni
error: Content is protected !!