Tarun Bharat

मराठी चित्रपटसृष्टीला उद्योगाचा दर्जा देणार : अजित पवार

ऑनलाईन टीम / पुणे : 

‘मराठी चित्रपट सृष्टीला उद्योगाचा दर्जा देण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असून लवकरच त्याबाबत निर्णय जाहीर केला जाईल’,असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी दिले. राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाच्या वतीने अजित पवार यांना चित्रपट सृष्टी आणि कलाकारांच्या समस्यांबाबत निवेदन देण्यात आले. तेव्हा हे महत्वपूर्ण आश्वासन त्यांनी दिले. 


प्रदेश कार्याध्यक्ष बाबा पाटील, समन्वयक संतोष साखरे, अभिनेते आणि प्रदेश उपाध्यक्ष विजय पाटकर, अभिनेत्री आणि प्रदेश सरचिटणीस सविता मालपेकर, अभिनेत्री आणि पुणे जिल्हाध्यक्ष प्रिया बेर्डे, व विद्या म्हात्रे यांनी अजित पवार यांची भेट घेऊन अनेक समस्यांबाबत चर्चा केली. 


राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाच्या वतीने मराठी चित्रपट सृष्टीला इंडस्ट्रीचा दर्जा मिळावा. तसेच मुंबई, पुण्यात, कोल्हापूर, नाशिक या शहरांमध्ये कलाकारांसाठी कलाकार भवन उभं करावं,ज्येष्ठ कलाकारांचे मानधन  तीन हजार आहे ते  15 हजार रुपये महिना असे करावे,तसेच राज्यातील चित्रपटगृहे बंद असताना देखील आकारला गेलेला  स्थानिक मालमत्ता कर, सरसकट देण्यात आलेले वीज  बिल  माफ करावे किंवा त्याच्यामध्ये सूट द्यावी, वेळ  द्यावा, सिडको आणि म्हाडा येथे राखीव कोट्यातून कलाकारांना घरे मिळावी अशा मागण्याचे निवेदन अजित पवार यांना देण्यात आले.   

अजित पवार म्हणाले, ‘संबंधित मंत्र्यांशी आणि प्रमुख सचिवांशी बोलून लवकर आदेश काढू .आतापर्यंत कोणीच ही मागणी शासनाकडे आणली नाही,त्यात राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट सांस्कृतिक विभाग पाठपुरावा करीत आहे, त्यामुळे शासन तातडीने निर्णय घेईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.  

Related Stories

पुणे विभागात कोरोना रुग्णांची संख्या 80,405

Tousif Mujawar

पुणे विभागातील 5 लाख 99 हजार 800 कोरोनामुक्त!

Tousif Mujawar

सोलापुरात नव्याने आढळले 6 कोरोनाबाधीत रूग्ण

Archana Banage

नितीन गडकरींच्या विरोधातही CBI चा वापर होण्याची भीती; कन्हैया कुमारचा भाजपवर निशाणा

Archana Banage

२०० टक्के खरे ! राज ठाकरेंच्या ‘या’ टीकेला चंद्रकांत पाटलांचे समर्थन

Archana Banage

क्रीडा व शिक्षण खात्याचा मंत्री एकच हवा

datta jadhav
error: Content is protected !!