Tarun Bharat

मराठी भाषेचा अभिमान बाळगा

विविध ठिकाणी मराठी भाषा दिन साजरा : नाटय़गीत-भावगीतांचा बहारदार कार्यक्रम

प्रतिनिधी / बेळगाव

स्वरकुसुम नाटय़गीत-भावगीतांचा बहारदार कार्यक्रम

मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून वाङ्मय चर्चा मंडळातर्फे रविवारी स्वरकुसुम हा नाटय़गीतांचा व भावगीतांचा बहारदार कार्यक्रम मंडळाच्या सभागृहात झाला.

प्रारंभी मंडळाचे माजी कार्याध्यक्ष कै. अशोक याळगी आणि कार्यकारिणी सदस्य भा. वि. सोहनी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मंडळाचे नाटय़ शाखा प्रमुख विठ्ठल याळगी व विद्यमान कार्याध्यक्ष प्रा. अनिल पाटणेकर यांच्या हस्ते कुसुमाग्रज यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मंडळाचे नाटय़कर्मी सुधीर जोशी यांनी 80 व्या वर्षात पदार्पण केले त्यामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला.

वाङ्मय चर्चा मंडळाला चाळीसगाव येथील रंगगंध कलासक्त न्यासतर्फे पुरुषोत्तम दारव्हेकर स्मृतिप्रित्यर्थ ऑनलाईन जागतिक अभिवाचन स्पर्धेत मिळालेल्या यशाबद्दल लेखिका आशा रतनजी, दिग्दर्शक आसावरी भोकरे, त्यातील कलाकार जयवंत साळुंखे, योगेश रामदास, अक्षता पिळणकर, अभिजीत देशपांडे, तसेच साहाय्यक गुरु पेडणेकर यांचा सन्मान मंडळाचे कार्याध्यक्ष प्रा. अनिल पाटणेकर यांच्या हस्ते करण्यात आला.

मोगरा फुलला, केव्हा तरी पहाटे, हे सुरांनो चंद्र व्हा, लावणी-रेशमाच्या रेघांनी, भैरवी-सर्वात्मका सर्वेश्वरा अशा मधूर गाण्यांनी संगीता बांदेकर-कुलकर्णा यांनी मैफल बहारदार रंगविली. त्यांना तबल्यावर संतोष पुरी व संवादिनीवर सारंग कुलकर्णी यांची साथ लाभली. निवेदन नीता कुलकर्णी यांचे होते.

तेजस्विनी सोमसाळे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. कोविड नियमांचे पालन करून झालेल्या या मैफल कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

चव्हाट गल्ली मराठी शाळा

चव्हाट गल्ली येथील मराठी शाळा क्र. 5 येथे आगळय़ा वेगळय़ा पद्धतीने मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. शाळेची माजी विद्यार्थिनी साक्षी मोर्डेकर हिने 10 वी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल तर श्रद्धा कुंडेकर हिने मराठी विषयात सर्वाधिक गुण घेतल्याबद्दल शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर शाळेतील इतर विद्यार्थी-विद्यार्थिनींना मास्कचे वाटप करण्यात आले.

शाळेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून अनिल आजगावकर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी रवी नाईक होते. व्यासपीठावर माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दीपक किल्लेकर, शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष अशोक अष्टेकर, निवृत्त तहसीलदार टी. ए. जाधव, मुख्याध्यापक के. आर. कडोलकर, श्रीकांत कडोलकर, किसन रेडेकर उपस्थित होते. कार्यक्रमानंतर घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. हरिनाथ बुवा यांनी सूत्रसंचालन केले. व्ही. व्ही. पाटील यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, पालक उपस्थित होते.

मराठी विद्यानिकेतन

मराठी विद्यानिकेतन येथे मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. शाळेच्या शिक्षिका शीतल बडमंजी यांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना शीतल बडमंजी यांनी कुसुमाग्रजांचे मराठी साहित्यातील योगदान कथन केले. यावेळी मुख्याध्यापक आय. व्ही. मोरे, गजानन सावंत, सांस्कृतिक विभागप्रमुख बी. एम. पाटील यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन धीरजसिंह रजपूत यांनी केले.  

पंडित नेहरु महाविद्यालय

अळवण गल्ली, शहापूर येथील पंडित नेहरु महाविद्यालयात जागतिक मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी ईशस्तवन व स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मराठी भाषेचा गौरव आणि अभिमान बाळगला पाहिजे, असे मनोगत विद्यार्थिनींनी आपल्या भाषणांतून व्यक्त केले. श्रद्धा पाखरे, सानिका चौगुले, ज्योत्स्ना, ऐश्वर्या चौगुले यांनी मराठी भाषा दिनानिमित्त विचार व्यक्त केले.

अनुराग लाड, धनश्री कदम यांनी मराठी अभिमान गीत सादर केले. यावेळी वाय. टी. मुचंडी, गीता कुलकर्णी, मयूर नागेनहट्टी यांनी मराठी भाषेची संस्कृती आणि कुसुमाग्रज यांची साहित्य शैली, मराठी परंपरा याबद्दल विचार व्यक्त केले. याप्रसंगी प्राध्यापक, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. प्रा. रेणू चलवेटकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Related Stories

शहर हेस्कॉम कार्यालयात पुन्हा कोरोनाचा शिरकाव

Tousif Mujawar

सहा वर्षाच्या मुलासह आई बेपत्ता

Amit Kulkarni

शुक्रवारी जिह्यात 18 नवे रुग्ण

Patil_p

अंध सायकलपटूचा 7 हजार कि. मी. चा सायकल प्रवास

Amit Kulkarni

खानापूर तालुका प्राथ.शिक्षक सोसायटीची सर्वसाधारण सभा उत्साहात

Patil_p

ओबीसी ‘ब’ प्रमाणपत्र देताना आयकर खात्याकडून एनओसी घ्या

Amit Kulkarni