Tarun Bharat

मराठी शुद्धलेखन तज्ज्ञ अरुण फडके यांचे निधन

ऑनलाईन टीम / ठाणे :

मराठी शुद्धलेखन तज्ज्ञ आणि भाषा अभ्यासक अरुण फडके यांचे आज सकाळी दहा वाजता नाशिक येथे निधन झाले. ते 60 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. मागील चार-पाच वर्षे ते नाशिक येथे मुक्कामी होते. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा आणि सून असा परिवार आहे. 


अरुण फडके यांच्या जाण्याने मराठी भाषेची मोठी हानी झाली आहे. ‘शुद्धलेखन ठेवा खिशात’ या छोट्या पुस्तिकेद्वारे त्यांनी घराघरात शुद्ध मराठी भाषा पोहोचवल होती. शुद्धलेखन हा आग्रह न होता सवय झाली पाहिजे असे त्यांचे ब्रीदवाक्य होते. त्यांनी लिहिलेली पुस्तके म्हणजे मराठी भाषेसाठी एक अमूल्य ठेवा आहे. 


ते मूळचे ठाण्याचे होते. त्यांच्या निधनानंतर सर्वत्र मराठी भाषेवर अप्रतिम प्रेम करणारे गुरुवर्य गेले अशी भावना व्यक्त होत आहे. 

Related Stories

संभाषणाची ध्वनीफीत व्हायरल केल्याप्रकरणी पोलिस शिपायावर गुन्हा

Archana Banage

उत्तर प्रदेशातील मुरादाबाद भाजी मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन

Tousif Mujawar

सचिन वाझे मातोश्रीवर दरमहिन्याला शंभर कोटी पाठवायचा; शिंदे गटाच्या खासदाराचा ठाकरेंवर गंभीर आरोप

Archana Banage

गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन

Archana Banage

अफगाणिस्तान जाणवले भूकंपाचे धक्के

Tousif Mujawar

अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीवरून काँग्रेसमध्ये मतभेद? शिवसेनेला पाठिंबा दिल्याने काँग्रेस नेते नाराज

Archana Banage