Tarun Bharat

मराठी साहित्य संमेलनांवरील निर्बंध घालणे थांबवा

प्रतिनिधी/ बेळगाव

गेल्या 35 वर्षांपासून सीमाभागामध्ये साहित्य संमेलने भरविली जात आहेत. या साहित्य संमेलनांना महाराष्ट्रातून साहित्यिक येत असतात. आजपर्यंत सर्व साहित्य संमेलने मोठय़ा उत्साहात आणि शांततेत पार पडली आहेत. स्व-खर्चातून सरकारचा कोणताही निधी नसताना, मराठी भाषिक साहित्य संमेलन भरवत आहेत. असे असताना आता साहित्य संमेलनावर निर्बंध घालण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ते तातडीने थांबवावेत, या मागणीसाठी तालुक्मयात विविध साहित्य संघांच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले.

काही मूठभर कन्नड दुराभिमानी या साहित्य संमेलनावर बंदी घालावी, अशी हास्यस्पद मागणी करत आहेत. प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचे संरक्षण करणे हा लोकशाहीनेच अधिकार दिला आहे. असे असताना केवळ दडपशाही करत मराठी भाषिकांना डिवचण्याचा प्रयत्न थांबावावा, असे या निवेदनात म्हटले आहे.

या साहित्य संमेलनामध्ये कोणत्याही जातीचा द्वेष केला जात नाही. केवळ आपल्या भाषेतील साहित्य या संमेलनाच्या माध्यमातून मांडले जाते. तेव्हा याचा विचार करून कोणत्याही प्रकारे साहित्य संमेलनावर निर्बंध घालू नये, अशी मागणी करण्यात आली. यावेळी कुदेमनी मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष एम. बी. गुरव, कडोली मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष बाबुराव गौंडवाडकर, उचगाव मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष लक्ष्मण होनगेकर, सांबरा मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष दिलीप चव्हाण, येळ्ळूर मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे, बेळगुंदी मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष बाबुराव काकतीकर, जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील, माजी आमदार मनोहर किणयेकर, दीपक दळवी, मालोजी अष्टेकर, नेताजी जाधव, आर. आय. पाटील, ऍड. नागेश सातेरी, ता. पं. सदस्य रावजी पाटील, सुनिल अष्टेकर, ऍड. सुधीर चव्हाण, ऍड. शाम पाटील, प्रकाश मरगाळे, शुभम शेळके, अरुण पाटील, विनायक होनगेकर, डॉ. तानाजी पावले, रमेश धामणेकर, सुभाष मजुकर यांच्यासह मराठी साहित्य संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

Related Stories

बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग अकादमीच्या स्पर्धा उत्साहात

Amit Kulkarni

जागा दाखवा, लवकरच ग्राहक आयुक्त फोरम स्थापन करू

Amit Kulkarni

काळय़ा यादीतील गुन्हेगारांची परेड

Amit Kulkarni

तिनईकरांवर हल्ल्यासाठी दीड लाखाची सुपारी

Omkar B

येळ्ळूरमध्ये ज्ञानेश्वरी पारायण सोहळय़ास प्रारंभ

Amit Kulkarni

‘डॉक्टरांनो गावाकडे चला’अभियान

Amit Kulkarni