Tarun Bharat

मराठी साहित्य संमेलनाची तारीख, स्थळाबाबत भुजबळ करणार घोषणा

Advertisements

ऑनलाईन टीम / नाशिक :

94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी निश्चित करण्यात आलेला 19 ते 21 नेव्हेंबरचा कालावधी सोयीचा नसल्याचे नियोजित संमेलनाध्यक्ष जयंत नारळीकर यांनी आयोजकांना कळविले आहे. त्यामुळे संमेलनाची नवीन तारीख व स्थळ याबाबतची घोषणा स्वागताध्यक्ष छगन भुजबळ उद्या करणार आहेत.

नियोजित साहित्य संमेलन 19 ते 21 नेव्हेंबर दरम्यान गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात होणार होते. तेथेच मुख्य कार्यक्रमाच्या सभामंडपासह इतर संमेलनातील सत्र घेण्यासाठी खुल्या मैदानावर मंडप टाकण्यात येणार होता. मात्र, कोरोना नियमावलीमुळे संमेलन बंदिस्त सभागृहात घेणे अपेक्षित आहे. त्यामुळे भुजबळ नॉलेज सिटीमध्ये डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात हे संमेलन घेण्याचा विचार सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज दुपारी 4 वाजता विश्वास क्लब हाउस, गंगापूर रोड येथे बैठक होणार आहे. या बैठकीत पूर्वतयारीचा आढावा, पुढील नियोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर उद्या छगन भुजबळ संमेलनाची नवीन तारिख आणि स्थळाची घोषणा करणार आहेत.

Related Stories

सातारा तालुक्यात दोन्ही राजे एकाच पक्षात

Patil_p

९२ नगरपरिषदांच्या ओबीसी आरक्षणावर आज सुनावणी

Archana Banage

मुगळीच्या युवकाकडून गावठी पिस्तुल, काडतुसे जप्त

Archana Banage

मुख्यमंत्री तारखेनुसार शिवजयंती साजरी करणार : अनिल परब

prashant_c

गृहराज्यमंत्र्यांकडून एपीआय मानेंच्या धाडसाचा गौरव

Patil_p

संचारबंदी काळात परप्रांतीयांना आमदार पी.एन. पाटील यांचा मदतीचा हात

Archana Banage
error: Content is protected !!