Tarun Bharat

मराठ्यांची उद्या एमपीएससीवर धडक

मराठा क्रांती ठोक मोर्चाचे दिलीप पाटील, सचिन तोडकर यांची माहिती

प्रतिनिधी / कोल्हापूर

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजाला ओबीसीतून आणि 50 टक्केच्या आतील आरक्षण मिळावे या मागणीला आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराजांच्या करवीर नगरीतून पुन्हा एकादा एल्गार पुकारण्यात आला आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत सकल मराठा समाजाच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहून यामागणीकडे लक्ष वेधले आहे. तर मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने बुधवार दि. ८ डिसेंबर रोजी एमपीएससीच्या मुंबईतील कार्यालयावर धडक मारण्यात येणार आहे. हे आंदोलन ठोक क्रांती मोर्चाचे समन्वयक दिली पाटील, सचिन तोडकर यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे.

उच्च न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यभर तीव्र पडसाद उमटले असुन. विरोधी पक्षांनी या मुद्दावरुन सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली दाभोळकर कॉर्नर येथे रास्तारोको केले होते. त्यानंतर विविध मार्गांनी आंदोलनाची तीव्रता कायम होती. राज्य सरकारने अद्यादेश काढून ओबीसींचे आरक्षण पुन्हा देण्याचा प्रयत्न केला. मात्र सर्वोच्च न्यायालयाने यास स्थगिती दिल्याने राज्यातील मराठा संघटना पुन्हा आक्रमक झाल्या आहेत. यातुन मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करत 50 टक्केच्या आतील कायदेशीर आरक्षणाची मागणी पुढे आली आहे. तर पहिल्या टफ्फ्यातील आंदोलनाला कोल्हापुरात सुरवात होत आहे.

Related Stories

नाशिक-पुणे महामार्गावर शिवशाही बसचा बर्निंग थरार, जीवितहानी नाही

Archana Banage

के. व्ही. कामत यांना केंद्रात मंत्रिपद?

Patil_p

Kolhapur : दोन महिन्यांत शहराचा कायापालट करा

Abhijeet Khandekar

सिंधुदुर्गचा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी सांगली – कोल्हापूरहून ५०० कर्मचारी

Archana Banage

कोल्हापूरची टेबल-टेनिसस्टार वैष्णवीचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

Abhijeet Khandekar

सातारा : एक अहवाल पॉझिटिव्ह तर एकाचा मृत्यु

Archana Banage