Tarun Bharat

मर्कंटाईल सोसायटीच्या चेअरमनपदी संजय मोरे तर व्हाईस चेअरमन रमेश ओझा

Advertisements

बेळगाव/प्रतिनिधी

येथील मर्कंटाईल कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटीच्या चेअरमनपदी संजय मोरे यांची फेरनिवड करण्यात आली तर व्हाईस चेअरमनपदी ज्येष्ठ संचालक श्री रमेश ओझा यांची निवड करण्यात आली. सोसायटीच्या मावळत्या व्हा.चेअरमन शारदा सावंत यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत ही बिनविरोध निवड झाली. यावर्षी संस्थेची संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक पार पडली. ज्यामध्ये जुन्याच संचालकांची फेरनिवड करण्यात आली.

यात प्रसन्ना रेवनावर, किशोर भोसले, शारदा सावंत, सविता कणबरकर, सदाशिव कोळी, जयपाल ठकाई, दत्ता मोरे व इलाही मुजावर यांचा समावेश आहे. उपस्थित संचालकांचे संजय मोरे यांनी अभिनंदन केले तसेच सभासदांचा सोसायटीवर असलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले. सर्व सभासद संचालक कर्मचारी वर्ग वपी कलेक्टर्स यांना सोबत घेऊन पुढील पाच वर्षांमध्ये नवनवीन योजना व उपक्रम राबवण्याचा विचार व्यक्त केला. उपस्थित संचालक व कर्मचाऱ्यांनी संजय मोरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून आगामी पाच वर्षासाठी चेअरमन पदी व संस्थेचे संचालक पदी झालेल्या निवडीबद्दल अभिनंदन केले.

Related Stories

शहराच्या पाणीपुरवठय़ात सोमवारपर्यंत व्यत्यय

Amit Kulkarni

महाराष्ट्र सरकारकडून येळ्ळूर मराठी मॉडेलला लवकरच निधी

Patil_p

आता राजहंसगडाची महती देशभरात

Amit Kulkarni

हेस्कॉमच्या कारभारामध्ये सुधारणा करा

Patil_p

कार्डधारकांना दोन महिन्यांचे रेशन एकाचवेळी

tarunbharat

बेकिनकेरेत शाळांचे निर्जंतुकीकरण

Patil_p
error: Content is protected !!