Tarun Bharat

मर्सिडीजच्या हॅमिल्टनचे 100 वे जेतेपद

वृत्तसंस्था/ सोची, रशिया

मर्सिडीजच्या लेविस हॅमिल्टनने 100 वे ग्रां प्रि जेतेपद मिळवित असा पराक्रम करणारा पहिला फॉर्मुला वन ड्रायव्हर होण्याचा बहुमान मिळविला. येथे झालेली सोची ग्रां प्रि शर्यत जिंकून त्याने चॅम्पियनशिप रेसमध्ये व्हर्स्टापेनला मागे टाकत पुन्हा एकदा अग्रस्थान मिळविले आहे. रेड बुलच्या मॅक्स व्हर्स्टापेनने दुसरे तर फेरारीच्या कार्लोस सेन्झने तिसरे स्थान मिळविले.

इंजिन पेनल्टीमुळे व्हर्स्टापेनला 20 व्या स्थानावरून सुरुवात करावी लागली. तरीही त्याने दुसरे स्थान मिळविण्यापर्यंत मजल मारली. हॅमिल्टनने आता व्हर्स्टापेनवर दोन गुणांची आघाडी घेतली असून या मोसमातील अद्याप सात शर्यती बाकी आहेत. या शर्यतीआधी हॅमिल्टन मॅक्सपेक्षा पाच गुणांनी मागे होता आणि त्याने चौथ्या स्थानावरून सुरुवात केली होती. मॅक्लारेनचा लँडो नॉरिस शेवटच्या तीन लॅपमध्ये आघाडीवर होता. पण पाऊस सुरू झाल्यानंतर ट्रकवरील निसरड टाळण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्याला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

हॅमिल्टनने मायकेल शुमाकरचा 91 जेतेपदांचा विक्रम मागील मोसमातच मागे टाकला होता. मॅक्सने शेवटच्या स्थानावरून सुरुवात करून दुसरे मिळविल्यानंतर हॅमिल्टनने त्याच्या कामगिरीचे कौतुक केले. याशिवाय पावसामुळे नॉरिसची गाडी घसरल्याने त्याला मागे टाकण्याची संधी मिळाल्याचेही तो म्हणाला. हॅमिल्टनने 100 वा विजय साजरा केला तर त्याच्या टीमने सोचीमध्ये मिळविलेल्या शंभर टक्के यशाचा आनंद साजरा केला. 2014 पासून मर्सिडीजने सोचीमध्ये झालेली प्रत्येक शर्यत जिंकली आहे. मॅक्लारेनच्या डॅनियल रिकार्दोने चौथे, मर्सिडीजच्या व्हाल्टेरी बोटासने 16 व्या स्थानावरून सुरुवात करीत पाचवे स्थान मिळविले.

Related Stories

दक्षिण आफ्रिका टी-20 लीग स्पर्धेत खेळण्यास पाकच्या क्रिकेटपटूंना संमती

Patil_p

नेशन्स लीग फुटबॉल स्पर्धेचे फ्रान्सला जेतेपद

Patil_p

टी-20 मानांकनात भारताचे अग्रस्थान अधिक भक्कम

Patil_p

सित्सिपसला हरवून क्रोएशियाचा कोरिक अजिंक्य

Patil_p

म्हापशातील ओल्या कचऱयावर प्रतिदिन 10 टन प्रक्रिया करण्याचा विचार- मंत्री मायकल लोबो

Patil_p

विश्व कनिष्ठांची बॅडमिंटन स्पर्धा रद्द

Patil_p