Tarun Bharat

मलकापूर आगारातील निलंबित कर्मचाऱ्यांच्या पाठीशी सर्व कर्मचारी

प्रतिनिधी / शाहुवाडी

मलकापूर आगारातील निलंबित केलेल्या पाच कर्मचारी बांधवांच्या पाठीशी आगारातील सर्व कर्मचारी वर्ग खंबीरपणे पाठीशी असून आमच्या मागण्या मान्य होत नाही. तोपर्यंत आमचा हा लढा सुरूच राहणार असल्याची प्रतिक्रिया ही मलकापूर आगारातील कर्मचारी वर्गाने व्यक्त केली.

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करावे या मागणीसाठी सुरू असलेल्या संपात कर्मचारी यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जात आहे याच पार्श्वभूमीवर मलकापूर आगारातील राकेश कांबळे ‘एस डी गवळी ‘व्ही एम हिरवे बी एच जाधव सुरेश पाटील या पाच कर्मचारी वर्गावर निलंबनाची कारवाई केली आहे. या पाचही कर्मचारी बांधवांच्यामागे मलकापूर आगारातील सर्व कर्मचारी सक्षमपणे व खंबीरपणे पाठीशी आहेत. आमच्या मागण्या रास्त असून त्यासाठीच आमचा हा लढा अविरतपणे सुरू असल्याची प्रतिक्रिया ही यावेळी कर्मचारी वर्गातून व्यक्त करण्यात आली. या निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांचा आगारातील कर्मचाऱ्यांच्यावतीने विशेष सत्कार करण्यात आला.

दलित महासंघाने दिला पाठींबा

दरम्यान भारतीय दलित महासंघाचे अध्यक्ष गौतम कांबळे यांनीही मलकापूर आगारातील कर्मचाऱ्यांना आंदोलनस्थळी येऊन पाठिंबा दर्शविला तुमच्या मागण्या रास्त असून सर्व संघटनांनी एकत्रित पणे हा लढा सुरूच ठेवावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Related Stories

महावितरण अर्ज छाननी विरोधात सकल मराठा समाज आक्रमक

Archana Banage

आवळीत माहिलेशी गैरवर्तन; एकावर गुन्हा दाखल

Archana Banage

मनपा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची सुकाणु समिती

Archana Banage

Kolhapur; राजाराम बंधारा पाण्याखाली, जिल्ह्यात पावसाचा जोर कायम

Abhijeet Khandekar

इचलकरंजीत सायझिंगच्या बग्यास आणि लाकडाला आग

Archana Banage

कोल्हापूर जिल्हय़ात डॉक्टरसह 15 कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage