Tarun Bharat

मलकापूर येथील ऑक्सिजन प्लांटसाठीच्या कामाचा शुभारंभ

प्रतिनिधी / शाहुवाडी

मलकापूर तालुका शाहूवाडी येथील ग्रामीण रुग्णालयानजीक उभा राहत असलेल्या ऑक्सिजन प्लांटसाठी विद्युत पुरवठा कामाचा शुभारंभ कार्यकारी अभियंते दिपक पाटील यांच्या  शुभ हस्ते करण्यात आला हा प्लांट तात्काळ उभारण्यासाठी वीज वितरण कडून सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचेही प्रतिपादन यावेळी दीपक पाटील यांनी केले.

सर्वत्र कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. या परिस्थितीत कोरोना ग्रस्त नागरिकांना ऑक्सिजन पुरवठा तात्काळ होण्यासाठी शासनाने ऑक्सिजन प्लांट उभा करण्यासाठी विशेष निधी उपलब्ध केला आहे. या पार्श्वभूमीवर मलकापूर ग्रामीण रुग्णालय येथे ऑक्सीजन प्लॉंट उभारला जात आहे. यासाठी आवश्यक असलेल्या विद्युत पुरवठा कामाचा शुभारंभ मलकापूर ग्रामीण रुग्णालय येथे करण्यात आला यावेळी. उपकार्यकारी अभियंता शाहुवाडी विभाग श्यामराज ए ए , मलकापूर ग्रामीणचे वैद्यकीय अधिकारी डॉ आशुतोष तराळ, यांची प्रमुख उपस्थिती होती .

कार्यकारी अभियंता यांची तळमळ

 महावितरणचे कार्यकारी अभियंता दीपक पाटील यांनी  या प्लांटसाठी अन्य बाबींची पूर्तता होण्यापूर्वी वीज वितरण कडून आवश्यक असलेल्या कामास तात्काळ मंजुरी दिली पंधरा दिवसापूर्वी शाहूवाडी तालुक्यातील दोन तरुण पती-पत्नीचा झालेला मृत्यू आणि त्या नंतर आईबापाला दुरावलेली दोन चिमुकली आजही मनाला चटका लावून जात आहेत. यामुळे माझ्या तालुक्यातील जनतेला कोरोना कालावधीत आरोग्यसुविधा तात्काळ मिळण्यासाठी उभा राहत असलेल्या ऑक्सीजन प्लांट साठी सर्वतोपरी सहकार्य  करणार असल्याचे मतही दीपक पाटील यांनी  यावेळी व्यक्त केले.

Related Stories

कोल्हापूर जिल्ह्यात नव्या रूग्णांसह सक्रीय रूग्णांत घट

Archana Banage

यड्रावमध्ये दोन ट्रकची समोरासमोर धडक

Archana Banage

‘कबनूरच्या इनाम जमिनी रद्द कराव्यात’

Archana Banage

कोल्हापूर : कौटुंबिक वादातून पतीच्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू

Archana Banage

अखेर बॉक्समधील गुळावर तोडगा-सौदे पूर्ववत

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : खिंडी व्हरवडे सापडला दुसरा कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage