शाहुवाडी/प्रतिनिधी
मलकापूर शहरातील त्या पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या संस्थात्मक अलगीकरणात ठेवलेल्या ६० वर्षीय महिलेचा रिपोर्ट कोरानापॉझिटिव्ह आल्याने मलकापूर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या सातवर गेली आहे, तर १८ रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने शहराला मोठा दिलासा मिळाला आहे
खुठाळवाडी येथील डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या मलकापूर शहरातील परिचारिकेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता, त्यानंतर तिच्या कुटुंबीयातील पाच जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्यांच्या संपर्कातील १९ जणांना संस्थात्मक अलगी करणात ठेवण्यात आले होते. यातील १८ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने मलकापूर शहरासह पंचक्रोशी ला दिलासादायक बातमी ठरली आहे मात्र एका महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्या परिसरात नगर परिषदेने विशेष खबरदारी घेतली आहे. मात्र यापुढेही शहरात प्रवेश करणार्या नागरिकांनीही गांभीर्य ओळखून पूर्ण खबरदारी घेणे गरजेचे आहे.


previous post