Tarun Bharat

मलप्रभा ब्रिजवर दोन अवजड वाहनांची धडक, जिवीतहानी टळली

बेळगाव-गोवा मार्ग अद्याप बंद

वार्ताहर/कणकुंबी

बेळगाव गोवा या राज्यमहामार्ग जोडणाऱ्या कुसळी जवळील मलप्रभा ब्रिजवर दोन अवजड वाहनांची धडक झाल्याने बेळगाव गोवा अशी वाहतूक काल 27 मे रोजी संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून बंद झाली आहे.

ब्रिटिशकालीन मलप्रभा नदीवर कुसळी जवळ असलेल्या ब्रिजला शंभर ते सव्वाशे वर्षांचा इतिहास आहे या पुलावर अनेक अपघात झालेले असून बेळगाव व गोव्याला जोडणारा तसेच जांबोटी कमी भागाला जोडणारा हा महत्त्वाचा फुल आहे. या फुलावरून गोव्याहून बेळगावकडे जाताना हा अपघात झाला. या अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली.

हा पूल अरुंद असताना देखील दोन्ही वाहनचालकांनी न थांबता गाड्या पार करण्यासाठी प्रयत्न केला यावेळी ब्रिजवर दोन्ही गाड्यांची धडक झाल्याने दोन्ही गाड्या कठड्यांला धडकल्या. यात लोखंडी साहित्य घेऊन जाणारा ट्रक सुदैवाने ब्रीजवरुन कोसळताना वाचला. एकंदरीत दोन्ही वाहनचालकांना ब्रिज पार करण्याची घाई झाली होती हे अपघातावरून दिसते. ब्रिजवरील दोन्ही कठड्यांमुळे मोठा अनर्थ टळला. या अपघातामुळे बेळगाव गोवा अशी वाहतूक संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत टप्प झाली होती.

या अपघाताची माहिती मिळताच खानापुर पोलीस उपनिरीक्षक बसनगौडा पाटील हे आपल्या सहकाऱ्यांशी अपघात स्थळी येऊन मार्गावरील वाहतूक सुरू करण्यासाठी जवळपास तीन तास प्रयत्न केले. मात्र अवजड वाहनांना या मार्गावरून वाहतुकीला बंदी असून देखील बिनधास्तपणे अवजड वाहतूक केली जाते प्रशासनाने वेळीच लक्ष घालून या मार्गावरील अवजड वाहतूक अन्य मार्गाने वळवावे अन्यथा प्रवासी वाहतुकीला सुद्धा हा मार्ग बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शंभर ते सव्वाशे वर्षांच्या या ब्रिजला ब्रिजचे आयुर्मान संपत आलेले असून प्रशासनाने वेळीच लक्ष देणे जरुरीचे आहे.

Related Stories

तालुक्यातील 63 हजार जनावरांच्या कानांवर टॅग

Patil_p

घरपट्टी भरलेल्यांना मिळणार 5 टक्के सवलत

Amit Kulkarni

बेंगळूर हिंसाचारात एसडीपीआयचा सहभाग : मंत्री आर. अशोक

Archana Banage

केंद्रीय माहिती आयुक्त डॉ. माहुरकर यांची ‘लोकमान्य’ला भेट

Amit Kulkarni

येडूर येथे रांगोळी स्पर्धा उत्साहात

Patil_p

पोलीस अधिकाऱयांच्या बदल्या

Amit Kulkarni