Tarun Bharat

मलाबारतर्फे ‘वन इंडिया वन गोल्ड रेट’ योजना सुरू

प्रतिनिधी / बेळगाव

मलाबार गोल्ड ऍण्ड डायमंड्स या सुवर्णपेढींनी ‘वन इडिया वन गोल्ड रेट’ ही अभिनव योजना सुरू केली आहे. वास्तविक प्रत्येक शहरात आणि राज्यात सोन्याचे दर वेगवेगळे असतात. मात्र मलाबार गोल्डने देशातील सर्व राज्यांमध्ये सोन्याचा एकच दर ठरविला असून हॉलमार्कच्या गुणवत्ता प्रमाणपत्रासह उत्कृष्ट दर्जा आणि शुद्धता हे उद्दिष्ट ठेवले आहे.

जेंव्हा आंतरराष्ट्रीय सोन्याचा दर भारतात सोन्याची आयात झाल्यावर बदलतो. दोन राज्यांमध्ये किंवा दोन शहरांमध्ये सोन्याचा दर बलदतो आणि ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. मलाबारने या महत्त्वाच्या मुद्दय़ावर अभ्यास करून देशातील सर्व राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये सोन्याचा दर एकच असेल यावर भर दिला आहे. जेणेकरून सोने खरेदीदारांची सुरक्षितता महत्त्वाची मानली आहे.

भारतामध्ये सोन्याला खूप महत्त्व आहे. बचत आणि गुंतवणूक याचे ते महत्त्वाचे स्तोत्र आहे. वन इंडिया वन गोल्ड रेटमुळे देशातील कोणत्याही शहरामध्ये मलाबारच्या शोरुममध्ये गेल्यास ग्राहकांना एकच दर आकारला जाईल. याबद्दल मलाबार ग्रुपचे चेअरमन अहमद एम. पी. म्हणतात, कोविडमुळे सर्वच क्षेत्रांमध्ये समस्या निर्माण झाली. मात्र सोन्याची मागणी वाढतच राहिली आहे. लोकांचे सोन्याबद्दलचे आकर्षणच त्यामुळे स्पष्ट झाले आहे.

मलाबारने ग्राहकांचे हित आणि पारदर्शक व्यवहार महत्त्वाचा मानला आहे आणि त्याच हेतूने ही योजना सुरू केली आहे. लवकरच येणाऱया दिवाळीच्या खरेदीवेळी मलाबारच्या देशातील 120 शोरुममध्ये एकाच दराने सोने विक्री केली जाईल. मलाबारचे एमडी आशर यांच्या मते ग्राहकांना शुद्ध आणि उच्च प्रतीचे सोने खरेदी करण्यासाठी ही एक अभूतपूर्व संधी आहे.

Related Stories

अलतगा येथे बँक ऑफ इंडियातर्फे जागृती मेळावा

Amit Kulkarni

उड्डाणपुलावरील पथदीप दिवसरात्र सुरूच

Amit Kulkarni

शहरात रामनवमी साधेपणाने साजरी

Amit Kulkarni

आता वीजबिलाचेही कानडीकरण

Amit Kulkarni

सदाशिव आयोगाला मान्यता द्या

Patil_p

शहर परिसरात बसवेश्वर जयंती साजरी

Patil_p