Tarun Bharat

मलाबार गोल्ड ऍण्ड डायमंड्सच्या 24 व्या शोरूमचा शुभारंभ

प्रतिनिधी/ बेळगाव

मलाबार गोल्ड ऍण्ड डायमंड्स शोरूमची 24 वी व बेंगळूर शहरातील आठवी शोरूम नुकतीच सुरू करण्यात आली. मलाबार ग्रुपचे चेअरमन एम. पी. अहम्मद यांनी ऑनलाईन पद्धतीने या शोरूमचे उद्घाटन केले. त्यांच्या समवेत कार्यकारी संचालक ओ. आशर, शामलाल अहम्मद, अब्दुलसलाम आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना एम. पी. अहम्मद म्हणाले, सदर शोरूममध्ये वधूसाठी खास दागिने, पारंपरिक दागिने, महिलांना दररोज वापरता येतील असे दागिने या शिवाय मोती आणि प्लॅटिनमचे दागिने उपलब्ध आहेत. सर्व दागिन्यांवर हॉलमार्कचा शिक्का असून गुणवत्ता उच्च दर्जाची आहे. मलाबारमध्ये सर्व व्यवहार पारदर्शक असल्याने ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यास मलाबार ग्रुप यशस्वी झाला आहे. जुने दागिने देऊन खरेदी करताना जास्तीतजास्त दर दिला जातो.

कोरोनाकाळातील सर्व नियमांचे पालन मलाबारच्या शोरूम्समध्ये केले जाते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Related Stories

जमिनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यास आत्मदहन करू

Patil_p

शेतकऱयांच्या हितासाठी दोन्ही मार्केट सुरू ठेवा

Amit Kulkarni

सकाळी विद्यार्थ्यांची तर दुपारी शिक्षकांची शाळा

Patil_p

एलआयसी ओबीसी कर्मचारी वेल्फेअर असोसिएशनची सर्वसाधारण सभा

Amit Kulkarni

जिल्हय़ात बर्ड-फ्लूचा शिरकाव रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय

Patil_p

दुसऱया टप्प्यातील मतदानासाठी जिल्हाधिकाऱयांकडून पाहणी

Patil_p