Tarun Bharat

मला गाडीने नको, विमानाने न्या; नाहीतर…

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई :

मला गाडीने कानपूरला नेले तर यूपी पोलीस वाटेतच माझा एन्काऊंटर करतील. त्यामुळे मला विमानाने नेण्यात यावे, अशी मागणी विकास दुबे याचा उजवा हात मानला जाणाऱ्या अरविंद त्रिवेदीने आज ठाणे न्यायालयात केली.

शुक्रवारी कुख्यात गुंड विकास दुबेचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्र एटीएसने शनिवारी ठाण्यातून त्रिवेदीसह त्याचा ड्रायव्हर सोनू तिवारीला अटक केली होती. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. दोघांचीही 21 जुलैपर्यंत तळोजा जेलमध्ये रवानगी केली आहे. उत्तर प्रदेश पोलीस येताच या दोघांना त्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. याआधी त्यांची कोविड तपासणी केली जाणार आहे.

त्रिवेदी हा एका भाजीच्या गाडीतून उलटसुलट प्रवास करत ठाण्यात पोहचला होता. एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना याबाबतची माहिती मिळाली. त्यानंतर नायक यांनी त्रिवेदी आणि तिवारीला ठाण्यातील नातेवाईकांकडून ताब्यात घेतले होते.

Related Stories

एसटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे वेतन तत्काळ

Archana Banage

सातारा : शिंदीगावात 14 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू

Archana Banage

”पंतप्रधानांना गुजरातच्या पुढे आणि मुख्यमंत्र्यांना मुंबई महापालिकेच्या पुढे काही दिसत नाही ”

Archana Banage

Rajyasabha Election; पी. चिदंबरम आणि इतर पाच जण तामिळनाडूतून राज्यसभेवर बिनविरोध येण्याची शक्यता

Abhijeet Khandekar

शिवसेना -राष्ट्रवादी एकत्र येऊन लढले तर राज्यात चमत्कार होईल- संजय राऊत

Archana Banage

अनुष्का आणि विराट कोहलीकडून कोरोनाबाधितांना 2 कोटी रुपयांची मदत

Tousif Mujawar
error: Content is protected !!