Tarun Bharat

मला बोलायचं आहे, पण आताच नाही, लवकरच सविस्तर बोलेन : शरद पवार

ऑनलाईन टीम / पुणे :


शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, असे वादग्रस्त विधान भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले होते. या विधानाचे राज्यभर पडसात उमटत आहेत. या वक्तव्यावर आतापर्यंत शरद पवार यांनी काही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. या सर्व शरद पवार यांची भूमिका काय? शरद पवार पुण्यात काही बोलतात का? याकडे सर्वांचे लक्ष होते.


आज पुण्यात झालेल्या एका बैठकीनंतर प्रश्न विचारला असता शरद पवार यांनी एक सूचक विधान केले आहे. शरद पवार म्हणाले, मला बोलायचं आहे, पण एवढ्यात नाही, लवकरच सविस्तर बोलेन असे म्हटले आहे.  


दरम्यान, पुण्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह इतर प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत शरद पवार यांनी पुण्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला. 

यावेळी शरद पवार यांना प्रश्न विचारला असता, मला बोलायचं आहे, पण आताच नाही, लवकरच सविस्तर बोलेन, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं.

Related Stories

रायगडात 1535 नागरीकांचे स्थलांतर; देवेंद्र फडणवीस

Abhijeet Khandekar

मुंबई विद्यापिठाच्या वसतीगृहाला सावरकरांचे नाव

Abhijeet Khandekar

आरोग्याच्या सर्व सुविधा तत्परतेने पुरवाव्यात – आरोग्य मंत्री टोपे

Archana Banage

देशाचे वैभव वाढविणे, हेच ‘आत्मनिर्भर’तेचे उद्दिष्टय़

Amit Kulkarni

जिल्हा बँक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न; मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

Archana Banage

जवानांना आता वज्र अन् त्रिशूळाचाही आधार

datta jadhav