Tarun Bharat

मलेशियन पंतप्रधान महातीर मोहम्मद यांचा राजीनामा

Advertisements

अन्वर इब्राहिम यांच्याकडे पदभार देण्यास विरोध झाल्याने निर्णय

वृत्तसंस्था / क्वाललांपूर

जगातील सर्वात ज्येष्ठ नेते ठरलेले मलेशियाचे पंतप्रधान महातीर मोहम्मद यांनी राजीनामा दिला आहे. पंतप्रधान कार्यालयाने ही माहिती दिली आहे. ते 94 वर्षांचे आहेत. त्यांच्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याने आणि अन्वर इब्राहिम यांच्याकडे पदभार देण्यास विरोध केल्याने महातीर यांनी हा निर्णय घेतला.

गेल्या चोवीस तासांपासून सुरु असलेल्या या राजकीय नाटय़ाचा महातीर यांच्या राजीनाम्याने शेवट झाला आहे. अन्वर यांच्या 2018 साली स्थापन झालेल्या पॅक्ट ऑफ होप या महाआघाडीने सरकार पाडण्याचा प्रयत्न चालवला होता. या विरोधकांचा अन्वर यांची नेतेपदी निवड करण्यासही विरोध होता. महातीर यांनी अन्वर यांची उत्तराधिकारी म्हणून निवड केली. परंतु अन्य सदस्यांना ते पसंत न पडल्याने त्यांनी अडथळे निर्माण केले. अन्वर आणि महातीर यांच्यामध्ये 2018 नंतर चांगले संबंध प्रस्थापित झाले. त्याआधी दोघेही विरोधक होते. म्हणूनच अन्य सदस्यांकडून विरोध होत असल्याचे राजकीय तज्ञांचे मत आहे.

तरीही महातीर यांनी अन्वर यांच्याकडे राजकीय सुत्रे सोपवण्याचा निर्णय घेतला होता. त्याला यश येत नसल्याने अखेर यांनी राजीनाम देण्याची घोषणा केली. सोमवारी दुपारी 1 वाजता त्यांनी राजीनामा राजांकडे सुपूर्त केला. मात्र यामुळे पुढील घडामोडींबाबत अस्पष्टता निर्माण झाली आहे. आता राजा काय भूमिका घेणार यावर याकडे मलेशियन जनतेचे लक्ष लागले आहे.

Related Stories

कोरोनामुक्त डोनाल्ड ट्रम्प यांचा आता प्रचारावर भर

Patil_p

60 टक्के रशियन क्षेपणास्त्रे वाया !

Patil_p

गाझावरील हल्ल्यात एपीची इमारत उध्वस्त

Patil_p

ऑस्ट्रेलियातील वणवे रोखण्यास मिळतेय यश

Patil_p

ज्युलियन असांजचे होणार अमेरिकेकडे प्रत्यार्पण

Patil_p

या गावात 95 वर्षांपर्यंत जगतात महिला

Patil_p
error: Content is protected !!