नवी दिल्ली : मध्यप्रदेशचा मल्ल सनी जाधव याला प्रशिक्षणासाठी केंद्रीय क्रीडामंत्रालयाने 2.5 लाख रूपयांचे साहाय्य करण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत स्थान मिळविण्यासाठी सराव आणि साहित्यासाठी जाधव सध्या मोलमजुरी करीत आहे. 2018 साली राजस्थानमध्ये झालेल्या 23 वर्षाखालील वयोगटातील कनिष्ठांच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सनी जाधवने रौप्यपदक मिळविले होते. तसेच 2020 साली भुवनेश्वर येथे झालेल्या ‘खेलो इंडिया’ विद्यापीठ क्रीडास्पर्धेत त्याने 60 किलो वजन गटात प्रतिनिधीत्व केले होते. आता पंडित दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय वेलफेअर निधीतून सनीला 2.5 लाख रूपयांची मदत दिली जाणार आहे. सनीची आर्थिक स्थिती खूपच खराब झाली असून 2017 साली त्याच्या वडिलांचे निधन झाले होते.


previous post
next post