Tarun Bharat

मल्हारपेठ येथे सकाळी गव्याचे दर्शन

प्रतिनिधी/सुळे

मल्हारपेठ ( ता- पन्हाळा ) येथे आज सकाळी कुंभारकी नावाच्या शेतामध्ये गव्याचा वावर असल्याचे दिसून आले . सकाळी सात वाजता मल्हारपेठ नवलेवाडी रस्त्यावर फिरायला गेलेल्या लोकांना सप्तरंग बिअर बार जवळ शेतामध्ये एका गव्याचे दर्शन झाले. मानवी वस्ती जवळच गव्याचे दर्शन झाल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

परिसरात मल्हारपेठ नवलेवाडी, सावर्डे, वाघुर्डे या गावातील शेतामध्ये या गव्याचा मुक्काम असण्याची शक्यता आहे. संबंधित गव्याची माहिती वन विभागाला दिली असून गव्याला परत पाठवण्यासाठी वनविभाग त्याच्या मागावर आहे. तरी या गव्याला शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी हुलकावून लावण्याचा प्रयत्न करू नये अनथा गवा बिथरू शकतो असे आवाहन वन विभागाने केले आहे.

Related Stories

ट्रक्टर ट्रॉली चोरी करणारे तीघे जेरबंद, 10 लाखांचा मुद्देमाल जप्त

Archana Banage

राजारामपुरीतील मुक्ता पब्लिकेशनवर `आयकर’चे छापे

Archana Banage

राणेंच्या अडचणी वाढणार; एसीबीने दिले चौकशीचे आदेश

datta jadhav

शिरोळमध्ये तीन पानी जुगार अड्ड्यावर धाड; दोन लाखांचा मुद्देमाल जप्त चौघे ताब्यात

Archana Banage

मानखुर्दच्या चिल्ड्रन्स होममध्ये कोरोनाचा शिरकाव, 29 गतिमंद मुले बाधित

datta jadhav

महाराष्ट्रात आजपासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण

Tousif Mujawar